लाखो भाविकांनी घेतले पवित्र पोशाखाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:34 AM2017-12-03T01:34:44+5:302017-12-03T01:34:49+5:30

ईद -ए -मिलादुन्नबीनिमित्त मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र पोशाख व मिशीच्या केसाचे दर्शन घेण्यासाठी खुलताबादेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

 The appearance of holy clothes taken by millions of devotees | लाखो भाविकांनी घेतले पवित्र पोशाखाचे दर्शन

लाखो भाविकांनी घेतले पवित्र पोशाखाचे दर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : ईद -ए -मिलादुन्नबीनिमित्त मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र पोशाख व मिशीच्या केसाचे दर्शन घेण्यासाठी खुलताबादेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
दिवसभर लाखो भाविकांनी पवित्र पोशाखाचे दर्शन घेतले. या पवित्र ‘पहेरान मुबारक’ दर्शनासाठी भारतातून मुस्लीम भाविक येतात. त्याचबरोबर ख्वाजा बुºहानोद्दीन यांच्या दर्गातही मोहंमद पैगंबर यांचा मिशीचा केस दर्शनासाठी आजच्या दिवशी ठेवला जातो. दर्गाह कमिटीचे अध्यक्ष शरिफोद्दीन रमजानी, सचिव मसियोद्दीन यांनी या उत्सवाची माहिती दिली. भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे म्हणून उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष डॉ. अरूण जºहाड, सचिव मुख्याधिकारी सौरभ कटीयार, उपाध्यक्ष मुनीबोद्दीन, नगराध्यक्ष अ‍ॅड. एस.एम.कमर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन, महंमद नईम, जियाओद्दीन आदी परिश्रम घेत होते.

Web Title:  The appearance of holy clothes taken by millions of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.