धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का?

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 17, 2023 08:03 PM2023-11-17T20:03:57+5:302023-11-17T20:04:05+5:30

आजघडीला जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालयांची नोंद आहे. हे सर्व रुग्णालय खासगी आहेत.

Are 10% beds available in charitable hospitals at concessional rates? | धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का?

धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का?

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक धर्मादाय न्यासाअंतर्गत नोंद असलेल्या रुग्णालयांनी दुर्बल घटकांसाठी सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी १० टक्के खाटा रिकामे ठेवावे. तसेच दुर्बल घटकांतील रुग्णास मोफत उपचार द्यावेत, अशा सूचना धर्मादाय विभागाने दिले आहेत. मात्र, याचा प्रचार-प्रसार तळागाळांतपर्यंत होत नसल्याने गरीब रुग्ण खासगी रुग्णालयाऐवजी ‘घाटी’ मध्येच उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात २५ धर्मदाय रुग्णालय
आजघडीला जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालयांची नोंद आहे. हे सर्व रुग्णालय खासगी आहेत. अशा रुग्णालयांना जमीन कमी किमतीत सरकारने दिलेली असते. अन्य सवलतील, फायदेही या रुग्णालयांनी उचललेले असते. त्या बदल्यात त्यांना दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार करणे, त्यासाठी १० खाट रिकाम्या ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. असे एकाच वेळी २५० गरीब रुग्णांना एका वेळी उपचार घेता येतो.

दररोज वेबसाईटवर माहिती अपडेट
धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्याकडे असलेल्या खाटापैकी किती खाटा आज उपलब्ध आहेत. याची माहिती charity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर द्यावी लागते. या साईटवर गेल्यावर कोणत्या धर्मादाय रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, हे लक्षात येते.

राज्याप्रमाणे जिल्ह्याचीही समिती
धर्मादाय रुग्णालयांत १० टक्के खाटा दुर्बल घटकांसाठी सवलतीच्या दरात देणे बंधनकारक आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरीय समितीची रचना करण्यात आली आहे. यासंदर्भात विधि व न्याय विभागाकडून ३१ ऑक्टोबरला नवीन अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

गरिबांची घाटी रुग्णालयात धाव
धर्मादाय रुग्णालय जिल्ह्यात किती व कोणते याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली नाही. याविषयी गरीब रुग्ण व त्याचे नातेवाईक अनभिज्ञ असल्याने ते रुग्णाला सरळ घाटी रुग्णालयातच दाखल करतात.

Web Title: Are 10% beds available in charitable hospitals at concessional rates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.