अतिक्रमण पथकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:53 AM2017-12-16T00:53:35+5:302017-12-16T00:53:43+5:30
मिल कॉर्नर भागातील बारापुल्लागेटजवळ नाल्यात एका महिलेने मनपाच्या जागेवर ३० बाय ६० आकाराचे अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी आज दुपारी मनपाचे पथक पोहोचले असता अतिक्रमण केलेल्या महिलेने पोलीस निरीक्षक, इमारत निरीक्षकांवर चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने पोलिसांच्या अंगावर रॉकेल ओतण्याचाही प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मिल कॉर्नर भागातील बारापुल्लागेटजवळ नाल्यात एका महिलेने मनपाच्या जागेवर ३० बाय ६० आकाराचे अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी आज दुपारी मनपाचे पथक पोहोचले असता अतिक्रमण केलेल्या महिलेने पोलीस निरीक्षक, इमारत निरीक्षकांवर चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने पोलिसांच्या अंगावर रॉकेल ओतण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोठा पोलीस बंदोबस्त मागवून अखेर महिलेचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
बारापुल्ला गेटच्या बाजूला खाम नदी वाहते. या नदीच्या पात्रात एक मोठी तटरक्षक भिंत आहे. या भिंतीला लागूनच एका महिलेने ३० बाय ६० आकाराचे अतिक्रमण आठ दिवसांपूर्वी केले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने त्वरित हे अतिक्रमण काढून घ्यावे, अशी सूचना केली होती. यापूर्वी एकदा मनपाचे पथक तेथे पोहोचले असता महिलांनी पथकाला पिटाळून लावले होते. शुक्रवारी मनपाचे पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद आणि पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी मोठा फौजफाटा घेऊन दुपारी १२.३० वाजता बारापुल्लागेट येथे अतिक्रमण काढण्यास दाखल झाले. अतिक्रमणाच्या जागेवर आठ ते दहा महिला उभ्या होत्या. त्यांनी महापालिकेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना प्रचंड शिवीगाळ केली. त्यांची बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी काहीच उपयोग झाला नाही. एका महिलेने पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि इमारत निरीक्षक जमशीद यांच्या अंगावर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला. लगेचच दुसºया महिलेने चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. महिलांची ही दबंगगिरी पाहून पोलीसही क्षणभर अवाक झाले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सर्व महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये लोखंडी पत्र्याचे शेड निष्कासित करण्यात आले.
रात्री उशिरा मनपातर्फे बेगमपुरा पोलीस ठाण्यात संबंधित महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये शबाना बेगम, सुनीता आठवले, रंजना अहिरे, नीता गायकवाड, वत्सलाबाई गडकर, सना जावेद खान व अन्य चार ते
पाच महिलांचा आरोपींत समावेश आहे.