औरंगाबाद : घराबाहेर खेळणाऱ्या तीनवर्षीय चिमुकलीला कुरकुरे खाण्यास देऊन एका महिलेने तिचा अपहरणाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री सातारा परिसरातील आमराई कॉलनीत घडली. यावेळी सजगतेने चिमुकलीच्या पालकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी संशयित महिलेला अटक केली. न्यायालयाने तिला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.लीलाबाई प्रकाश शिंदे (४०, रा. भिवंडी, मुंबई) असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. याविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, महानुभाव आश्रमाजवळील आमराई कॉलनीमध्ये राहणाºया तक्रारदार ३२ वर्षीय महिलेला तीन वर्षाची बालिका आहे. ही चिमुकली त्यांच्या शेजारी राहणाºया आठ वर्षीय मुलासोबत मंगळवारी रात्री घरासमोरच खेळत होती. यावेळी आरोपी लीलाबाई शिंदे हिने दोन्ही चिमुकल्यांजवळ मोठे माणूस कोणीही नसल्याचे पाहिले. यानंतर तिने चिमुकल्यांना कुरकुºयाचे पाकीट दाखवून जवळ बोलावले. कुरकुºयाच्या पाकिटासाठी दोन्ही चिमुकले लीलाबाईजवळ गेले. यावेळी लीलाबाईने तीनवर्षीय बालिकेला उचलून कडेवर घेतले. तर आठ वर्षीय मुलाचा हात पकडून त्यांना घेऊन ती तेथून वेगात जाऊ लागली. त्याचवेळी दोन्ही चिमुकल्यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांना हा काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या महिलेला थांबवून ही मुले कोणाची आहेत, असे विचारले, तेव्हा ती चिमुकल्यांना सोडून पळून जाण्याचा प्रयत्न क रू लागली. यावेळी नागरिकांनी तिला पकडले आणि या घटनेची माहिती तातडीने सातारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन लीलाबाईला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. ही बाब समजताच चिमुकल्यांच्या पालकांनी सातारा ठाण्यात याप्रकरणी संशयित लीलाबाई विरोधात तक्रार नोंदविली.चौकटन्यायालयाने ठोठावली पाच दिवसांची पोलीस कोठडीतपास अधिकारी उपनिरीक्षक बी. डी. राठोड यांनी बुधवारी दुपारी लीलाबाईला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आरोपी महिलेचे आणखी कोणी साथीदार आहेत का? अपहरणाचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तपास करायचा असल्याने तिला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. यानंतर न्यायालयाने लीलाबाईला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.---------
घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:42 PM