औरंगाबाद 'मध्य'मध्ये शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर; एमआयएम अन् ठाकरेसेना मागे

By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2024 10:29 AM2024-11-23T10:29:08+5:302024-11-23T10:32:39+5:30

'मध्य'मध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे दुपारी १:३० पर्यंत स्पष्ट होईल. 

auranagabad-central-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-Shiv Sena-candidate-Pradeep-jaiswal-leading-after-third-round-MIM and Thackerey sena behind | औरंगाबाद 'मध्य'मध्ये शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर; एमआयएम अन् ठाकरेसेना मागे

औरंगाबाद 'मध्य'मध्ये शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर; एमआयएम अन् ठाकरेसेना मागे

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबाद-मध्य' विधानसभेत मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत एकूण ८ हजार ९५४ मते घेऊन ३, ३४२ मतांनी आघाडीवर आहेत. 'मध्य'मध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे दुपारी १:३० पर्यंत स्पष्ट होईल. 

उस्मानपुरा येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतदान मोजले. पहिल्या फेरीत प्रदीप जैस्वाल यांना ३९२१ मते मिळाली. बाळासाहेब थोरात यांना १, ५८१, नासेर सिद्धीकी यांना ३ हजार ८८६ , तर सुहास दाशरथे यांना ३७ मते मिळाली.
दुसऱ्या फेरीत प्रदीप जैस्वाल यांना ५०३३ मते मिळाली. बाळासाहेब थोरात यांना २१४७, नासेर सिद्धीकी यांना  १७२६  ३८८६ , तर सुहास दाशरथे  यांना ५५ मते मिळाली.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स

२ लाख १८ हजार ९६६ मतदान मोजण्यासाठी  एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली.  मध्य मतदारसंघ उद्धवसेनेसाठी बालेकिल्ला आहे. २०१४ चा अपवाद वगळता येथे उद्धवसेनेनेच अधिराज्य गाजविले. यंदा मतदारसंघात कोणाचा झेंडा फडकेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बुधवारी ५९.३५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात २४ उमेदवार आहेत.

Web Title: auranagabad-central-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-Shiv Sena-candidate-Pradeep-jaiswal-leading-after-third-round-MIM and Thackerey sena behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.