'औरंगाबाद पूर्व'मध्ये उलटफेर; एमआयएमचे इम्तियाज जलील पुढे, मंत्री अतुल सावे यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:09 AM2024-11-23T10:09:47+5:302024-11-23T10:11:24+5:30
पहिल्या फेरीपासून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
छत्रपती संभाजीनगर:औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. चौथ्या फेरी अखेर इम्तियाज जलील 30 हजार 550 मतांनी आघाडीवर आहे. येथून मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसला आहे.
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत झाली असली तरी एमआयएम आणि भाजपमध्येच खरा सामना आहे.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024
२०१९ मध्ये या मतदारसंघात ६३.२ टक्के मतदान झाले होते. २०२४ साली ते ६०.६३ टक्के झाले. अडीच टक्क्यांनी मतदान घटले याचा अर्थ एकूण मतदानाच्या तुलनेत सुमारे ११ हजार मतदान कमी झाले आहे. लाडकी बहीण योजना आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा उत्साह अधिक असेल असे वाटत असताना मतदान कमी झाल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.दरम्यान, पहिल्या फेरीपासून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
औरंगाबाद पूर्व: चौथ्या फेरी
इम्तियाज जलील - 32478
गफार कादरी - 1928
अतुल सावे - 749
इम्तियाज जलील - 30 हजार 550 मतांनी आघाडीवर