औरंगाबाद जिल्ह्यात दावा 'खड्ड्यात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:42 AM2017-12-17T00:42:22+5:302017-12-17T00:42:31+5:30

१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असून जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती शनिवारी पाहणीत आढळून आली.

 Aurangabad district claims 'in pits' | औरंगाबाद जिल्ह्यात दावा 'खड्ड्यात'

औरंगाबाद जिल्ह्यात दावा 'खड्ड्यात'

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असून जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती शनिवारी पाहणीत आढळून आली. सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील ‘लोकमत’च्या वार्ताहरांमार्फत रस्त्यांची पाहणी केली असता बहुतांश प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले असले तरी त्याचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने बुजविलेले खड्डे महिनाभरातच उघडे पडत आहेत. त्यामुळे त्याचा वाहनधारकांना होणारा त्रास कायम असल्याची परिस्थिती दिसून आली. संपूर्ण जिल्ह्यातील रस्ते खºया अर्थाने खड्डेमुक्त झाले नसल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांना विकासाच्या धमन्या समजले जाते; परंतु या धमन्याच अशक्त झाल्याने अनेकांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अनेकांना अपंगत्व आले असून काही जणांना अपघातामुळे जीव गमवाला लागला आहे.
सोयगाव तालुक्यात नागरिकांची निराशा
सोयगाव : तालुका हा जिल्ह्यापासून सर्वात दूर असून येथील रस्त्यांची अवस्था स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सुधरलेली नाही. या मोहिमेत तरी रस्ते चांगले होतील, अशी आशा तालुक्यातील नागरिकांना होती, परंतु तेथेही निराशा झाली. सोयगाव ते बनोटी, सावळदबारा या भागातील रस्त्यांची व चाळीसगाव मार्गाची दुरवस्था जगजाहीर आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणे जिकरीचे आहे. आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने प्रामाणिक प्रयत्न न केल्याने सोयगाव तालुक्यातील विकासाच्या धमन्या ‘अशक्त’च होत चालल्या आहेत, ही तालुक्याची वर्षानुवर्षाची शोकांतिका आहे.
कन्नड तालुक्यात कासवगतीने काम
कन्नड : तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवगतीने सुरु आहे.
राज्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे, मात्र प्रत्यक्षात काही रस्त्यांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. तर काही रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी लागणाºया खडीची जमवाजमव सुरु आहे. कन्नड-पिशोर, करंजखेड-घाटशेंद्रा-टाकळी अंतूर, चापानेर-हसनखेडा, जेहूर -कोळवाडी, कालीमठ-पितळखोरा या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर आहे तर नागद, चिकलठाण, नागापूर या रस्त्यांची कामे सुरु झालेली नाहीत. उपअभियंता सी.ए.सोनवणे यांनी सांगितले की, तालुक्यातील राज्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले असून प्रमुख जिल्हा मार्गावरील काम येत्या आठ-दहा दिवसात पूर्ण करण्यात येईल.
गंगापूर : गंगापूर तालुक्यात खड्डे कायम असून रस्त्यांच्या समस्येवर होणाºया जनतेच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते. १५ डिसेंबरपर्यंत कुठलेही यशस्वी काम न झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील वाहेगाव ते जामगाव, साखर कारखाना फाटा ते नेवरगावच्या दिशेने सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या कामासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्च करण्यात आले.
काम झाल्यावर रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित एजन्सीकडे देण्यात आली होती. सदर मार्गाचे डांबरीकरण होऊन बारा महिन्याचा कालावधी झाला. बारा महिन्यातच या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्ता खचून मोठमोठे खड्डे तयार झाले असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत हैबतपूर येथील उपसरपंच राजेंद्र पवार, वाहेगाव येथील सरपंच नारायण मनाळ, उपसरपंच अनंता भडके यांनी रस्त्यासंदर्भात संबंधित शाखा अभियंता व उपअभियंत्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या, परंतु संबंधित अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत माहिती घेतली असता रस्ता करणाºया एजन्सीचे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली ८ लाख रुपये संबंधित विभागाकडे शिल्लक आहेत. या रकमेत मुदतीच्या आत म्हणजेच १५ डिसेंबरच्या आत दुरुस्ती करुन खड्डे बुजविणे शक्य होते, मात्र अधिकाºयांच्या वेळकाढूपणामुळे मुदतीच्या आत काम होऊ शकले नाही, असे वाहेगाव, हैबतपूर येथील पदाधिकारी म्हणाले. याशिवाय साखर कारखाना फाटा ते नेवरगाव मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी आगरकानडगाव, जामगाव, बगडी, ममदापूर, नेवरगाव येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते, तरीही खड्डे बुजविण्यात आले नाहीत. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून आता खड्ड्यांऐवजी नवीन रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे.
पैठण : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे अजूनही तग धरून आहेत. या खड्ड्यांना मुक्ती मिळावी म्हणून नागरिक करत असलेले प्रयत्न पूर्णपणे सफल होताना दिसत नाही.
मुख्य रस्त्यावरील जवळपास ७० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून उर्वरित खड्डे ३१ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
तालुक्यातील ३ स्टेट हायवे व ९ एमडीआर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामे प्रगतीपथावर आहेत. स्टेट हायवेवरील ७० टक्के तर एमडीआर (प्रमुख जिल्हा मार्ग) रस्त्यावरील ४० टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याचा दावा पैठणचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांनी केला आहे.खड्डे बुजविण्यासाठी पैठण सार्वजनिक बांधकाम विभागास तीन कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.
पैठण-शहागड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राज्य रस्ताअंतर्गत पैठण -औरंगाबाद, पैठण -पाचोड व पैठण -शहागड या रस्त्यावरील ७० टक्के खड्डे बुजविण्यात आले असून पुढील कामही प्रगतीपथावर आहे. तसेच गाव व तांडे जोडणारे ९ एमडीआर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम ४० टक्के झाले आहे.
या दोन्ही प्रकारच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम ३१ डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील, अशी हमी बोरकर यांनी दिली.
फुलंब्री : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धोकादायक खड्डे पडले असून हे खड्डे बुजविले गेले नाहीत, त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
फुलंब्री तालुक्यात बाबरा ते निधोना हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून धोकादायक खड्डे पडलेले आहेत. हा पाच कि.मी. लांबीचा रस्ता असून याची वर्षभरापासून दुरुस्ती केलेली नाही. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाच कि.मी. लांबीचे अंतर जाण्यासाठी एक तास लागतो.
याशिवाय तालुक्यातील बिल्डा ते धामणगाव, जातेगाव फाटा ते जातेगाव, चित्रकवाडी ते धामणगाव या रस्त्यांचीही अवस्था दयनीय आहे. तसेच औरंगाबाद ते जळगाव महामार्गावर काही ठिकाणी आजही खड्डे कायम असून त्यांची दुरुस्ती झालेली नाही.
सिल्लोड : तालुक्यातील घाटनांद्रा, चारनेर, आमठाणा, शिवना, धोत्रा, अजिंठा, शिवना, धावडा, अन्वा, उंडणगाव, गोळेगावसह तालुक्यातील विविध रस्त्यांची वाट लागली आहे. अजूनही या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. विकासाच्या धमन्या अशक्त झाल्याने या मार्गावरुन प्रवास करणे कसरतीचे बनले आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची डेडलाईन संपली, पण केवळ ४० टक्के खड्डे बुजविण्याचे काम थातूरमातूर करण्यात आले. तर ६० टक्के काम निकृष्ट व कासवगतीने सुरु आहे. सिल्लोड तालुक्यात अनेक रस्ते यापूर्वी कागदावर झाले आहेत. यामुळे काही ठेकेदारांवर कारवाईही झालेली आहे, तरीही कामात सुधारणा नाही. थातूरमातूर कामे करून बिल उचलण्यात सिल्लोड बांधकाम विभाग पटाईत आहे. खासदार निधी, आमदार निधीतून कोट्यवधी रुपये रस्त्यावर खर्च होतात, पण मर्जीतील ठेकेदार काम करीत असल्याने भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.
पुढाºयांचा वरदहस्त असल्याने काही अधिकारी टक्केवारी घेऊन ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवत आहेत. विशेष म्हणजे जवळपास सर्व अधिकारी औरंगाबाद येथून अप-डाऊन करतात. त्यामुळे कामांवर जाण्यास त्यांना सवड नाही. याचा फायदा ठेकेदार उचलतात. शनिवारी सिल्लोड तालुक्यातील मोढा ते धानोरा, भराडी रस्त्यावर याशिवाय आमठाणा, अंभई, उंडणगाव, पानवडोद, अन्वा ,सारोळा, डिग्रस, डोंगरगाव, अन्वी रस्त्यावरील खड्डे बुजविणे सुरु होते. या कामाची गती पाहता ही कामे अजून १५ दिवसातही होणे शक्य नाही. काही रस्त्यांवरील खड्डे बुजवणे सुरु आहेत. मोठमोठे खड्डे बुजविल्या जात आहेत. त्यात छोटे खड्डे सोडून दिले जात असल्याचे चित्र आहे. उखडलेली खडी, रस्त्यावर अस्त्याव्यस्त पडलेली आहे. त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होऊन ठेकेदार, अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. बांधकाम विभागाचे अभियंता खेडेकर यांना शनिवारी प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
खुलताबाद : जगप्रसिध्द वेरूळ लेणीकडे जाणारा कसाबखेडा फाटा ते वेरूळ, खुलताबाद ते म्हैसमाळ, बोडखा ते जटवाडामार्गे औरंगाबाद आदी प्रमुख रस्त्यांवर आजही मोठ्या प्रमाणावर खड्डेच असून बांधकाम विभागाने १५ डिसेंबरपर्यंत फक्त काही मोजक्याच रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. यात खुलताबाद ते फुलंब्री रस्त्याचे खड्डे बुजविले आहेत, मात्र तालुकाअंतर्गत रस्ते तसेच आहेत. खुलताबाद ते म्हैसमाळ रस्ता दोन

Web Title:  Aurangabad district claims 'in pits'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.