लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे.गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.सकाळी सरपंच अंकुशराव जावळे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना रोडलगतच कचरा पडलेला दिसला. या कच-याचा घाण वास येत होता. जावळे यांनी तात्काळ गावात येऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावक-यांना याबाबत माहिती दिली व काही क्षणांतच गावकरी संतप्त होऊन सरपंच जावळे यांच्या घरी जमा झाले व याची माहिती पाचोड पोलीस, पैठणचे आमदार संदीपान भुमरे, जि.प. सभापती विलास भुमरे व पैठण तालुका बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उपसरपंच शिवाजी तागड, बाळासाहेब जावळे, अण्णा पाटील, लहू जावळे, सुदर्शन जावळे, सतीश जावळे, प्रकाश जावळे, रामनाथ जावळे, रामनाथ भावले, दादा चिंतामणी, संदीप बुरकूल, नवनाथ कळमकर आदींनी घटनास्थळावर जाऊन संताप व्यक्त केला.
औरंगाबादचा कचरा महामार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:23 AM