औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:51 AM2019-01-22T00:51:13+5:302019-01-22T00:51:28+5:30
कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदारने अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले.
औरंगाबाद : कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.
औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदारने अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले. कशिष भराडनेही गोल्डन कामगिरी करताना आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत औरंगाबादने मुलांच्या गटात २ सुवर्ण, २ रौप्य व चार कास्य, तर मुलींच्या गटात एक सुवर्ण, तीन रौप्य व एका कास्यपदकाची कमाई केली.
वैयक्तिक क्रीडा प्रकारातील निकाल (फॉईल) मुले : १. दुर्गेश जहागीरदार, २. तुषार आहेर (दोघेही औरंगाबाद), ३. विपुल येडेकर (कोल्हापूर), ३. जय खंडेलवाल (मुंबई).
इप्पी : १. प्रथमकुमार शिंदे (कोल्हापूर), २. प्रणय पिंपळकर (नागपूर), ३. गिरीश जकाते (सांगली), ३. तुषार आहेर (औरंगाबाद). सायबर : १. आदित्य अंगल (कोल्हापूर), २. अभय शिंदे (औरंगाबाद), ३. धनंजय जाधव (कोल्हापूर), निखिल वाघ (औरंगाबाद).
फॉईल : १. हर्षदा दमकोंडवार (नागपूर), २. खुशी दुखंडे (मुंबई), ३. ज्योती सुतार (सांगली), ३. यशश्री पवार (सांगली). इप्पी (मुली) : १. वैष्णवी घोडके (अहमदनगर), ३. हर्षदा वडते (औरंगाबाद), ३. स्नेहल पवार (पालघर), ३. अस्मिता दुधारे (नाशिक).सायबर मुली : १. कशिष भराड (औरंगाबाद), २. निशा पुजारी (पालघर), ३. अस्मिता दुधारे (नाशिक), ३. स्नेहल पवार (पालघर).
सांघिक (फॉईल- मुले) : १. औरंगाबाद, २. नागपूर, ३. मुंबई, ३. सांगली. इप्पी : १. सांगली, २. कोल्हापूर, ३. नाशिक, ४. औरंगाबाद. सायबर : १. कोल्हापूर, २. औरंगाबाद, ३. मुंबई, ३. लातूर. फॉईल (सांघिक) मुली : १. नागपूर, २. औरंगाबाद, ३. मुंबई, ३. सांगली. इप्पी : १. मुंबई, २. लातूर, ३. नाशिक, ३. औरंगाबाद. सायबर : १. पालघर, २. औरंगाबाद, ३. सांगली. बक्षीस वितरण भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव आहेर, अशोक मगर, वसंतराव देशमुख, संजय देशमुख, अभय देशमुख, अशोक दाबके, प्राचार्य विजय भोसले, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.