शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

औरंगाबादेत पाणी मिळेना, कचरा हटेना; पथदिवे लागेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:56 PM

११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत, तर ६० दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी घ्यावे लागते आहे.

ठळक मुद्देबट्ट्याबोळ : नियोजन नसल्याने चार महिन्यांपासून शहरवासी मेटाकुटीस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत, तर ६० दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी घ्यावे लागते आहे. त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर पथदिव्यांचा लपंडाव सुरू झाला आहे. सेवा, सुरक्षा, विकासाचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या पालिका सत्ताधाºयांनी नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आणली आहे. पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.कधी पहाटे तर कधी रात्री तर कधी दिवसा, अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सध्या सुरू असून, आठवड्यातून चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा नवीन पायंडा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाडल्यामुळे शहरवासीय मेटाकुटीला आले आहेत. मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे.आठवड्यात नियोजन कराअडीच महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाने तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शहरात पाण्याची ओरड कायम आहे.पाणीपुरवठा विभागाने येत्या आठवड्यात दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी गुरुवारी दिले.दूषित पाणीपुरवठाकोणत्याही दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलवाहिनीत साचलेले आणि नव्याने सोडण्यात आलेले पाणी दूषित होऊन ते नळांना येत आहे. त्यामुळे कावीळसारखे आजार होऊ लागले आहेत. पुंडलिकनगर परिसरात लहान मुलांना ताप येणे, उलट्या होण्यासारखे आजार होऊ लागले आहेत. हा प्रकार शहरातील बहुतांश भागात होतो आहे. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठ्यावरून आकांडतांडव केले.नगरसेवकांचा संताप;साथीचे आजार होण्याची शक्यताऔरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले असून, साथरोगांचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. कचºयाच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरत आहे. शहराच्या स्वच्छतेवरून स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील कचºयाच्या प्रश्नावर नगरसेवक संतप्त झाले.समर्थनगर वॉर्डात जागोजागी कचºयाचे ढीग आहेत. बाहेरच्या वॉर्डातील कचरा गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार कळवूनही स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यास तयार नसल्याचा आरोप सदस्यऋषिकेश खैरे यांनी केला. पावसाळ्यात कचºयामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असल्याचे सदस्य शिल्पाराणी वाडकर म्हणाल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख विक्रम मांडुरके म्हणाले की, शहरातील कचरा उचलण्यात येत असून, तीन ठिकाणी टाकला जात आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत आहे. ओला कचरा प्रक्रिया केंद्रावर, तर सुका कचरा कंपनीला दिला जात आहे. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी औषधफवारणी करून त्यावर पावडर टाकण्याचे तसेच दोन दिवसांत शहर स्वच्छ करण्याचे आदेश सभापती राजू वैद्य यांनी दिले.अनेक भागांत पथदिवे बंदशहरातील व अनेक वॉर्डांतील पथदिवे बंद पडले आहेत. विद्युत विभागाला वारंवार कळवूनही पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचा मुद्दा नगरसेवकांनी स्थायी समितीत उपस्थित केला. पथदिवे लावण्यात आल्यानंतर एका दिवसात बंद होत असल्याची तक्रार नगरसेविका वाडकर, सत्यभामा शिंदे, स्वाती नागरे या सदस्यांनी केला. विद्युत विभागाचे उपअभियंता के.डी. देशमुख यांनी दिलेल्या उत्तरावर नगरसेवक संतापले. सभापती वैद्य यांनी प्रत्येक वॉर्डातील पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश दिले.महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्रघनकचरा व्यवस्थापनासाठी घनसावंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांना ४ महिने महापालिकेत कायम ठेवावे, अशी मागणी करणारे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ९ मार्चपासून मांडुरके पालिकेत शासनाच्या आदेशाने कचरा समस्या सोडविण्यासाठी कार्यरत झाले आहेत. दरम्यान, अंबडचे मुख्याधिकारी नंदकुमार भोंबे बुधवारी सहायक आयुक्त म्हणून महापालिकेत रुजू झाले.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नelectricityवीज