औरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी औरंगाबादकर रसिकांना लवकरच सुरू होणाऱ्या ६ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळणार आहे. दि. ९ ते १३ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे होणार आहे.नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे व स्वीडिश राजदूतावास यांचा या महोत्सवात विशेष सहभाग आहे, अशी माहिती सोमवारी याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी दिग्दर्शक अशोक राणे, अपर्णा कक्कड, मोहम्मद अर्शद, नंदकिशोर कागलीवाल, शिव कदम आदींची उपस्थिती होती.दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स, प्रोझोन येथे महोत्सवाचे उद्घाटन होईल. यंदाच्या आॅस्कर स्पर्धेत नामांकन असलेला ‘कोल्ड वार’ हा पोलंड भाषेतील चित्रपट दाखवून महोत्सवास खºया अर्थाने सुरुवात होईल.पाचदिवसीय महोत्सवात स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून, पाच आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रेक्षकांसह चित्रपट पाहतील. यातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलासा पारितोषिक देण्यात येईल. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील यात समावेश असेल. ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा आहेत, तर ज्युरी सदस्य म्हणून फे्रंच अभिनेत्री मारियान बोर्गा, आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक फैजल खान, चित्रपट अभ्यासक शिराज सय्यद, मार्क लिंडले काम पाहतील.दि. १२ रोजी ‘मोबाईल फोनने निर्माण केलेले फिल्ममेकर’ या विषयावर परिसंवाद होईल. तसेच ‘शॉर्ट फिल्म कशी बनवावी,’ याविषयी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी मार्गदर्शन करतील. दि. १३ रोजी एन. चंद्रा यांच्या उपस्थितीत पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार येईल. आॅस्करच्या स्पर्धेत यंदा नामांकन झालेला जपानचा ‘शॉप लिफ्टर्र’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. महोत्सवासाठी ४०० रुपये शुल्क असून, ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०० रुपयांत प्रवेशिका मिळतील.- महोत्सवात यावर्षी प्रथमच मराठवाड्यातील कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धा घेण्यात आली. यापैकी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ९ शॉर्ट फिल्म महोत्सवात दाखविण्यात येतील. यातील विजेत्यांना २५००० रुपये रोख व सिल्व्हर कैलासा पुरस्कार मिळेल.- महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त महात्मा आणि सिनेमा या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अमृत गांगर यांचा दृकश्राव्य स्वरूपातील कार्यक्रम, स्वीडनचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांच्या पाच अभिजात कलाकृती महोत्सवाचे आकर्षण आहे. याप्रसंगी भारतातील स्वीडन राजदूतावासाच्या कौन्सिल जनरल पुलरिका सनबर्ग यांची विशेष उपस्थिती असेल.- ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे येथील नॅशनल फिल्म अर्काईव्ह आॅफ इंडियातर्फे विशेष पोस्टर प्रदर्शन.
९ जानेवारीपासून औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:38 PM
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी औरंगाबादकर रसिकांना लवकरच सुरू होणाऱ्या ६ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळणार आहे. दि. ९ ते १३ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे होणार आहे.
ठळक मुद्देसांस्कृतिक : जगभरातील ४० दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन; ख्यातनाम कलावंतांची उपस्थिती