औरंगाबाद महापालिका आरक्षण सोडतीत दिग्गजांचे वार्ड झाले राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:50 PM2020-02-03T13:50:41+5:302020-02-03T13:53:45+5:30

एकूण ११५ वार्ड पैकी २२ वार्ड अनुसूचित जाती तर २ वार्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहेत

Aurangabad municipal reservation leaves ward for veterans | औरंगाबाद महापालिका आरक्षण सोडतीत दिग्गजांचे वार्ड झाले राखीव

औरंगाबाद महापालिका आरक्षण सोडतीत दिग्गजांचे वार्ड झाले राखीव

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यमान महापौर व उपमहापौर यांचे वार्ड राखीव

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी ( दि. ३ ) वार्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामुळे विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह अनेक दिग्गज नगरसेवकांचे वार्ड राखीव झाले आहेत. एकूण ११५ वार्ड पैकी २२ वार्ड अनुसूचित जाती तर २ वार्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहेत.   

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-२०२० मध्ये होणे संभाव्य असून, १८ डिसेंबर २०१९ रोजी बहुसदस्यीय प्रभाग पाडून सोडतीचा कार्यक्रम ठरला होता. मात्र राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने बहुसदस्यीय पद्धती रद्द करून पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धत लागू करण्याचे निर्णय घेतला. याची आरक्षण सोडत सोमवारी घेण्यात आली. यावेळी विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर विजय औताडे, जेष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांच्यासह अनेक दिग्गजांचे वार्ड राखीव झाले आहेत. 

अनुसूचित जातीसाठी २२ वार्ड आरक्षित 
वार्ड क्रमांक 8, 12, 16, 23, 29, 40, 50, 52, 58, 70, 77, 84, 87, 96, 101, 105, 110, 112, 113, 114, 115 हे 22 वार्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

अनुसूचित जमातीसाठी २ वार्ड आरक्षित 
वार्ड क्रमांक 3 एसटी प्रवर्गातील महिलेसाठी तर 13 वार्ड एसटी पुरुषांकरिता आरक्षित करण्यात आले आहेत.

सर्वसाधारण महिला (30 वार्ड राखीव)

1 हर्सूल, 11 जयसिंगपुरा, 56 भवानीनगर, 60 इंदिरा नगर बायजीपुरा पूर्व, 63 आविष्कार कॉलनी, 99 वेदांत नगर, 20 नारेगाव पश्चिम, 21 सावित्रीनगर नारेगाव पूर्व, 39 शताब्दीनगर, 59 बारी कॉलनी, 72 विष्णू नगर, 88 विश्रांती नगर, 89 गजानन नगर, 94 उल्कानगरी, 100 बन्सीलाल नगर, 103 वीटखेडा, 2 भगतसिंग नगर, 14 वानखेडेनगर होनाजीनगर, 25 पवननगर, 28 गणेश कॉलनी, 47 रोशनगेट शरीफ कॉलनी, 61 आत्मशकॉलनी, 64 गुलमोहरकॉलनी, 79 अंबिकानगर, 82 रामनगर, 83 विठ्ठल नगर, 98 कबीरनगर, 32 भडकलगेट, 37 शहाबाजार मकसुत कॉलनी, 106 देवानागरी प्रतापनगर

ओबीसी पुरूष :
7 पडेगाव, 10 नंदनवन कॉलनी, 22 चौधरी कॉलनी चिकलठाणा, 30 लोटाकारंजा, 51 औरंगपुरा, 54 सिल्लेखाना, 74 जवाहर कॉलनी, 95 जय विश्वभारती कॉलनी, 104 कांचनवाडी, 109 रामकृष्ण नगर, 85 चिकलठाणा, 76 एन-3 एन-4 पारिजातनगर, 41 शिवनेरी कॉलनी, 27 स्वामी विवेकानंदनगर, 66 अजबनगर कैलासनगर.

ओबीसी महिलासाठी राखीव-४-चेतनानगर,५-पहाडसिंगपूरा-बेगमपूरा, ५३- समर्थनगर, १११-भारतनगर-शिवाजीनगर, ३१- जयभिमनगर,३५-औरंगपूरा, ४३-गणेशनगर, ४४-रहिमानिया काँलनी, ५५-गांधीनगर,६८-पदमपूरा, ७५-विद्यानगर,७८-ज्ञानेश्वरनगर, ९१-न्यायनगर,३४-खडकेश्वर,४९-नवाबपूरा,११२-राहूलनगर.

अनुसूचित जातीसाठी राखीव- प्रभाग क़मांक- ८, १२, १६, १७, २३, २९, ४०, ५०, ५२, ५८, ७०, ७७, ८४, ९६, १०१, १०५, ११०, ११२, ११३, ११४, ११५. यातील महिलांसाठी राखीव एकूण ११ प्रभाग- २९-विश्वासनगर-चेलीपूरा, ५०- मोतीकारंजा-भवानीनगर, १०५- सुधाकरनगर, ११२- वसंत विहार, ११३- गोपीनाथपुरम देवळाई, ११४- सातारागाव-संग़ामनगर,५२-नागेश्वरवाडी,१६-मयूरपार्क, १७- सूरेवाडी, १२-आरेफ काँलनी,८४-कामगार काँलनी

अनुसूचित जमातीसाठी दोन वार्ड राखीव- ३-एकतानगर, १३- रोजेबाग-भारतमातानगर. यापैकी महिला राखीव-एकतानगर

Web Title: Aurangabad municipal reservation leaves ward for veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.