छुप्या पद्धतीने घरात दडवलेला २४ लाखाचा गुटखा जप्त; औरंगाबाद ग्रामीण गुन्हेशाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:22 PM2018-02-01T17:22:05+5:302018-02-01T17:41:18+5:30
लासूर स्टेशन आणि शिरेगाव येथील वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरात छुप्या मार्गाने ठेवलेला २४ लाख २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाडसत्र राबवून जप्त केला. हा गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद : लासूर स्टेशन आणि शिरेगाव येथील वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरात छुप्या मार्गाने ठेवलेला २४ लाख २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाडसत्र राबवून जप्त केला. हा गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सिंह म्हणाल्या की, सिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी गुटख्याचे गोडाऊन असून तेथूनच ग्रामीण भागातील गुटख्यांची होलसेल दरात विक्री होते. अशी माहिती खबर्यांकडून ग्रामीण गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यानंतर अप्पर अधीक्षक डॉ. उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक बी.जी. दुलत, व्ही.जी. जाधव, सहायक उपनिरीक्षक गफार पठाण, गणेश जाधव, वसंतराव लटपटे, विठ्ठल राख, विक्रम देशमुख, रंगराव बावस्कर, संजय काळे, रतन वारे, नवनाथ कोल्हे, रमेश अपसनवाड, संजय भोसले, अशिष जमधडे, राहुल पगारे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगिता थोरात, सुरेखा वाघ, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे यांनी आज सर्वप्रथम शिरेगाव येथील दादासाहेब लक्ष्मण क-हाळे यांच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्यांच्या घरासमोर उभ्या पिकअप वाहनामध्ये हिरा गुटख्याच्या ३८ गोण्या ,रॉयल टोबॅको
तंबाखूच्या १८ गोण्या भरलेल्या आढळल्या.
याच गावातील दिनेश कैलास गोटे यांच्या घरात हिरा गुटख्याच्या ३४ गोण्या, रॉयल टोबॅकोच्या १७ गोण्या, तर गोवा गुटख्याच्या १२ गोण्या मिळाल्या. लासुरस्टेशन येथील सलीम जाहेद बेग यांच्या घरावर धाड मारली असता तेथील पिकअप गाडीत ६८ गोण्या हिरा गुटखा, रॉयल टोबॅकोच्या ३४ गोण्या, हिरा गुटख्याचे पाऊचचे ७ गोण्या असा सुमारे २४ लाख ३१ हजाराचा माल मिळाला. यासोबतच चार लाखाचे दोन पिकअप गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईने ग्रामीण भागातील गुटख्यांचा होलसेल धंदा करणार्यांचे धाबे दणाणले आहे. जप्त गुटख्याच्या कारवाईची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.