औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 03:56 PM2019-04-07T15:56:41+5:302019-04-07T15:57:38+5:30

सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ कशामुळे आली?

Aurangabad, who is looted of water in the city? | औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

googlenewsNext

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. परिणामी लाखो औरंगाबादकरांना उन्हाळ्याचा कडाका सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. सामान्यांच्या पाण्यावर कोण डल्ला मारीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गुंतले आहेत, तर प्रशासन वितरण व्यवस्थेवर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात धरून बसल्याचा आरोप होतो आहे.

वर्षभरापासून कचऱ्याच्या समस्येने शहर गांजले आहे, तर दहा वर्षांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला नागरिक सामोरे जात आहेत. ११५ वॉर्डांपैकी ५० टक्के वॉर्डातही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेची वितरण व्यवस्था कुठे तरी सदोष असल्याची टीकेची झोड सर्वत्र उठत आहे. मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी शहर पाणीपुरवठ्यावर बोलताना सांगितले, येथील पाण्याचे हिशेब असे कसे काय होतात. गळती आणि चोरींवर मात करीत ११० एमएलडी पाणी येते. शहराला १६० एमएलडी पाण्याची गरज आहे.

११० मधून १०० एमएलडी जरी आले तरी हे  पाणी १६ ते १७ लाख लोकसंख्येला एकदाच पुरणे शक्य नाही. त्यामुळे दिवसाआड किंवा दोन दिवसांआड म्हटले तरी २०० एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत शहराची तहान भागू शकते, हा साधा हिशोब आहे. पाणी जायकवाडीतून तर रोज उपसले जात आहे. मग शहरात सात ते आठ दिवसांनी पाणी का येत आहे. काही ठिकाणी रोज येते, कुठे तीन दिवसांनी येते. असे वर्तमानपत्रातून छापून येते.

पालिकेचे वितरणाचे हिशेब का चुकत आहेत. सामान्य नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नाही. मनपाचा तांत्रिक माणूस कोण आहे, त्याला याबाबतचा अभ्यास का नाही. जलकुंभांचा आढावा का घेतला जात नाही. झोननिहाय जलकुंभ भरावेत आणि त्यातून पाणी वितरित करावे. नऊ झोनअंतर्गत किती जलकुंभ आहेत. त्याचा आढावा घेऊन वितरण का होत नाही.

पाण्याचे गणित चुकतेय कुठे व कसे 
दोन दिवसांत २२० एमएलडी पाणी येते. १६० एमएलडी जर शहराला दोन दिवसांत मिळाले तरी ६० एलएलडी पाणी शिल्लक राहते. ते पाणी ज्या वसाहतींत नळ नाही, तिकडे देता येते. झोनवाईज जलकुं भांचा, लोकसंख्येचा विचार करावा. साध्या माणसाला कळणारे हे गणित पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला का कळत नाही. ११० एमएलडी रोज पाणी येते. ते पण दिवसाआड किंवा दोन दिवसांआड द्यायचे आहे. जायकवाडीतील पाणी दीड ते दोन वर्षे पुरेल. पाणी असताना सामान्य नागरिकांचा असा छळ होणे अयोग्य आहे. झोननिहाय लोकसंख्या आणि पाणी वितरणाचा हिशोब झाल्यास ताबडतोब चोरी होते की गळती हे समोर येईल. आकाशवाणीवर पाण्याची गरज आणि कुटुंब यावर भाषण देण्यापेक्षा पूर्ण औरंगाबादचा कुटुंब म्हणून का विचार होत नाही. जबाबदारी यंत्रणाप्रमुखांनी याकडे जास्तीचे लक्ष दिले पाहिजे, असेही नागरे म्हणाले.

Web Title: Aurangabad, who is looted of water in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.