शस्त्रक्रिया टाळून अनेकदा प्लास्टर तंत्र ठरतेय उपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:20 PM2019-04-13T23:20:54+5:302019-04-13T23:21:11+5:30
शरीरातील एखाद्या भागाचे हाड तुटले की, शस्त्रक्रियाच करावी लागते, अशी लोकांची धारणा झालेली आहे; परंतु अनेकदा तुटलेली हाडे ही फक्त प्लास्टर तंत्राने जोडली जातात. त्यामुळे विनाकारण शस्त्रक्रियेला प्राधान्य देता कामा नये, असा सल्ला इंदूर येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. डी.के. तनेजा यांनी दिला.
औरंगाबाद : शरीरातील एखाद्या भागाचे हाड तुटले की, शस्त्रक्रियाच करावी लागते, अशी लोकांची धारणा झालेली आहे; परंतु अनेकदा तुटलेली हाडे ही फक्त प्लास्टर तंत्राने जोडली जातात. त्यामुळे विनाकारण शस्त्रक्रियेला प्राधान्य देता कामा नये, असा सल्ला इंदूर येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. डी.के. तनेजा यांनी दिला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शनिवारी (दि.१३) प्लास्टर तंत्रावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), इंडियन आॅर्थोपेडिक असोसिएशन, महाराष्ट्र आॅर्थोपेडिक असोसिएशन, औरंगाबाद आॅर्थोपेडिक असोसिएशन आणि घाटीतील अस्थिरोग विभागातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद््घाटन झाले. याप्रसंगी जम्मू येथील डॉ. राजेश गुप्ता, रायपूर येथील डॉ. सुबीर मुखर्जी, महाराष्ट्र आॅर्थोपेडिक असोसिएशनचे सचिव डॉ. प्रकाश सिगेदर, ‘आयएमए’चे सचिव डॉ. यशवंत गाडे, औरंगाबाद आॅर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सारंग देवरे, सचिव डॉ. मारुती लिंगायत, घाटीतील अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. मुक्तदीर अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. आलाफ पठाण, डॉ. मशुदूल सय्यद, डॉ. अमोल भगस, डॉ. मिलिंद लोखंडे, डॉ. श्रेयस धोटावडेकर, डॉ. लोके श योगी, डॉ. सिद्धेश कुलकर्णी, डॉ. विजय शिंदे, डॉ. गगनदीप माही, डॉ. श्रीकांत लांजूडकर, डॉ. गौरव मते, डॉ. अनुज पाटील आदी उपस्थित होते. डॉ. तनेजा, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. मुक्तदीर अन्सारी यांच्यासह उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
देशभरात कार्यशाळा
डॉ. राजेश गुप्ता म्हणाले की, हाडे मोडल्यानंतर शस्त्रक्रियेलाच प्राधान्य दिले जात आहे; परंतु अनेकदा त्याची गरज पडत नाही. यासंदर्भात देशभरात कार्यशाळा घेऊन नव्या डॉक्टरांना मार्गदर्शन केले जात आहे.