फटाके वाजविताना सावधान; होऊ शकतात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:19 AM2018-11-07T11:19:39+5:302018-11-07T11:23:04+5:30

दिवाळीचा सण साजरा करा. मात्र, नियमांचे उल्लंघन करू नका; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

Beware of cracking; Polic may File a case | फटाके वाजविताना सावधान; होऊ शकतात गुन्हे दाखल

फटाके वाजविताना सावधान; होऊ शकतात गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाईठाण्यांतर्गत पथके ठेवणार नजर

औरंगाबाद : दिवाळीचा सण साजरा करा. मात्र, नियमांचे उल्लंघन करू नका; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची पथके नेमण्यात आल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

आयुक्तालयांतर्गत दिवाळीमिलन कार्यक्रमात कर्मचारी, अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिवाळीचा फराळ करण्यात आला. यानिमित्ताने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा होते. विविध विषयांवर चर्चा करून दिवाळीचा आनंद साजरा करा; परंतु पर्यावरणपूरक दिवाळी व्हावी, आरोग्यदायी दिवाळी साजरी करावी,  नागरिकांनी आदेशाचे पालन करीत दिवाळीचा आनंद साजरा करावा, सणासुदीला इतरांना त्रास होईल, अशा पद्धतीने फटाके उडवू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.

दक्षता पथक
रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके वाजविण्याची परवानगी असून, त्यानंतर फटाके वाजविणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठाण्यांतर्गत ही पथके नेमण्यात आली असून, ते सर्व्हे करून ठाण्यात माहिती देतील.

Web Title: Beware of cracking; Polic may File a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.