सावधान, वीजबिल न थकलेले बरे, व्याजदर बँकांपेक्षाही जास्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:07 PM2022-05-11T17:07:21+5:302022-05-11T17:08:09+5:30

बिल वेळेवर भरलेलेच बरे, नाही तर महावितरणचे पथक तुमच्या दारी

Beware, it is better not to unpaid of electricity bill, interest rate is higher than banks! | सावधान, वीजबिल न थकलेले बरे, व्याजदर बँकांपेक्षाही जास्त !

सावधान, वीजबिल न थकलेले बरे, व्याजदर बँकांपेक्षाही जास्त !

googlenewsNext

औरंगाबाद : वीजबिल वेळेवर भरलेले बरे, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. कारण वीजग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवर व्याज द्यावे लागत आहे. वीजबिल थकीत ठेवणे परवडणारे नाही. बँकांपेक्षाही हे व्याजदर जास्त आहे. त्यामुळे व्याजाच्या रकमेचा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल वेळेवरच भरणे फायद्याचे ठरते.

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. नामुष्की आणि व्याजाचा भुर्दंड असा दुहेरी फटका या ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी वेळीच बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

व्याजाचा दर किती ?
ग्राहकांनी वीजबिल तयार झाल्यानंतर ७ दिवसांत ते भरल्यास त्यांना १ टक्का तात्काळ देयक भरणा सूट मिळते. त्याबरोबरच वीजबिल थकीत ठेवल्यास विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार व्याजाची आकारणी केली जाते. देयक तयार होण्याच्या ६० ते ९० दिवसांत भरल्यास १२ टक्के व्याज आकारले जाते. ९० दिवसानंतर देयक भरल्यास १५ टक्के व्याज लागते.

चक्रवाढव्याज नाही
वीजबिलावर चक्रवाढ व्याज आकारले जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महिनाभर महावितरणच्या विजेचा वापर केल्यानंतर वीजबिल आल्यावर मोबाईल ॲप आणि महावितरणच्या वेबसाईटवर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जवळच्या बिल भरणा केंद्रावर किंवा महावितरण कार्यालयात जाऊन भरणा करता येतो.

सर्वाधिक थकबाकी कृषी ग्राहकांची
सर्वाधिक थकबाकी ही कृषी ग्राहकांची आहे. वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना प्री-पेड मीटर बसविण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल.

वसुलीसाठी पथकांची स्थापना
जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. वीज खंडित केल्यावरही कुणी वीज चोरून वापरत असेल तर त्या ग्राहकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

किती आहे जिल्ह्यात थकबाकी? (कोटी रुपये)
वर्गवारी - मूळ थकबाकी - व्याज - एकूण थकबाकी

घरगुती - ७०.६९ - १७.२४ - ८७.९३
व्यावसायिक - ८.८४ -            १.५५ - १०.३९
औद्योगिक - ८.८३            - ४.२६ - १३.०९
कृषी - १७६६.०७ - ५७६.७ - २३४२.७७

Web Title: Beware, it is better not to unpaid of electricity bill, interest rate is higher than banks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.