लाखोंचे वीज बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:22 AM2017-12-19T00:22:25+5:302017-12-19T00:22:29+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे थकीत वीज बिल महावितरण कंपनीने वसूल केले नाहीतर प्रहार संघटनेने त्यांच्या निवासस्थानाचे वीज कनेक्शन कापण्याचा इशारा दिला होता. या सगळ्या गदारोळात जिल्हा प्रशासनाने सुमारे ४ लाख रुपयांचे वीज बिल महावितरण कंपनीला अदा केले आहे.

 Bill of electricity bill tired | लाखोंचे वीज बिल थकले

लाखोंचे वीज बिल थकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे थकीत वीज बिल महावितरण कंपनीने वसूल केले नाहीतर प्रहार संघटनेने त्यांच्या निवासस्थानाचे वीज कनेक्शन कापण्याचा इशारा दिला होता. या सगळ्या गदारोळात जिल्हा प्रशासनाने सुमारे ४ लाख रुपयांचे वीज बिल महावितरण कंपनीला अदा केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी निवासस्थानाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येणार या माहितीमुळे पोलिसांनी सोमवारी दिवसभर बंदोबस्त लावला होता; परंतु वीज बिल भरल्याचे पुरावे संघटनेला जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले.
७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांच्या निवासस्थानाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देणारे आंदोलन संघटनेने केले होते. तसेच ११ डिसेंबर रोजी महावितरण कंपनीला संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे थकीत वीज बिल वसूल करण्याचा इशारा दिला होता. सामान्य शेतकºयांचा वीजपुरवठा केला जात नाही.
शिवाय कमी दाबाने वीजपुरवठा करूनही मोठ्या रकमेची वीज बिले त्यांना दिली जात आहेत. विजेचा लपंडाव ग्रामीण भागात सुरू आहे. दुसरीकडे लाखो रुपयांचे वीज बिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे थकलेले असताना त्यांना अखंड वीजपुरवठा सुरू असतो, असे संघटनेने महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
दरम्यान, प्रहार संघटनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानाची सोमवारी वीज कापणार, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत निवासस्थानाभोवती बंदोबस्त लावला होता.
सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, सोमनाथ रोडे, शेख यांच्यासह सहकारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानासमोर तैनात होते. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण म्हणाले, निवासस्थानाची वीज कापण्यासाठी प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे तातडीने जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्त लावला. संघटनेचे कुणाल राऊत, संजय चव्हाण, अमित दांडगे, शिवाजी गाडे, अवी जगधने यांनी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता.
प्रशासनावर ओढवली नामुष्की
दोन महिन्यांचे वीज बिल थकविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. जिल्हा प्रशासनाने संघटनेच्या प्रहारानंतर वीज बिल भरले. वीज मीटर क्रमांक ४९००१०६९८६५८ चे ६४ हजार ३८६, ४९००१११९७९९७ चे २ लाख ७१ हजार ८३, ४९००१०९५७५७२ चे १३ हजार ९४६, ४९००११०५८८०६ या मीटरचे ५ हजार ५५३५ असे ३ लाख ५५ हजार ८५० रुपयांचे वीज बिल थकले होते. १६ डिसेंबर रोजी प्रशासनाने हे बिल अदा केले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता चिटणीस म्हणाले, महावितरणचे कुठलेही पथक निवासस्थानाकडे गेले नाही. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाशी निगडित वीज बिलांचा भरणा प्रशासनाने केला आहे.

Web Title:  Bill of electricity bill tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.