भाऊ... काम मिळेल का काम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:16 AM2018-01-07T00:16:08+5:302018-01-07T00:16:11+5:30

दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत.

 Brother ... work for work? | भाऊ... काम मिळेल का काम?

भाऊ... काम मिळेल का काम?

googlenewsNext

मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत. ते ‘भाऊ...काही काम आहे का काम’ अशी रस्त्यावर विचारणा करत असल्याचे विदारक तालुक्यात दिसत आहे.
तालुक्यात दहा महसूल मंडळांतर्गत ७६ हजार हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणाºया शेतकºयांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला. यामध्ये कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधून आलेल्या जवळपास दहा हजार परप्रांतीय मजुरांनाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यात कापसाचे पीक जोमात आले. मात्र, माप पदरात पडण्याआधीच बोंडअळीने खेळ केला. त्यामुळे परप्रांतीय मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतात कामच नसल्याने हे मजूर शहरातील कॉलेज रोड, हायवे चौफुली, स्टेशन रोडवर दररोज सकाळी येऊन थांबतात. मजुरांना कामाला लावण्यासाठी एखादा व्यक्ती येथे आल्यास शेकडो मजूर त्याच्याभोवती गराडा घालतात.
भाऊ, कोणतेही काम सांगा, आम्ही करतो. काय बी असू द्या आम्ही दोघे, तिघे, चौघेजण मिळून करतो, अशी विनवणी केली जाते. परंतु त्या व्यक्तीला एक किंवा दोनच मजूर पाहिजे असतात. दोन मजुरांना घेऊन गेल्यानंतर बाकीचे मजूर नाराज होऊन दुसºया व्यक्तीची वाट पाहतात.
तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतीकामासाठी मजूर पुरवणारे ठेकेदार कार्यरत झाले आहेत. यात गुजरात आणि मध्यप्रदेशातील मजुरांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रतिएकर दर ठरवून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. कमी कालावधी व वाजवी मजुरीत काम उरकण्यावर परप्रांतीयांचा भर असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
कांद्याची लागवड, गव्हाला पाणी देणे, ऊस लागवड आणि कापूस वेचणीचे काम परप्रांतीय मजूर करीत असतात. ३० ते ५० मजुरांची टोळी पन्नास ते साठ गावात शेतकºयांकडे विभागून काम करतात. सध्या परप्रांतीयांच्या या बाजारात महिन्यापासून गर्दी वाढली आहे.
वैजापूर तालुक्यात दरवर्षी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, यंदा बोंडअळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. यंदा सुमारे सत्तर टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे तालुक्याला दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा फटका बसल्याचे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.

Web Title:  Brother ... work for work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.