शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघात ३ जण ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोनि. राजेंद्र बोकडे, पोउनि. सुनील अंधारे यांनी अपघात करून फरार झालेल्या कार चालकाला पकडण्यासाठी तपासाची चक्रे फिरविली. त्यांनी काही ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शहरातील एका हॉटेलमधील कॅमेऱ्यात एक कार आढळली. त्या कार (क्र. एम.एच.२० डीबी ७२८६)चा शोध घेतल्यानंतर ती अजिंठा येथे आढळली. कार चालक शेख जाहेद मोहम्मद अनिस याला पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, रात्री समोरून येणाऱ्या ट्रकच्या लाइटच्या प्रकाशझोतात रस्त्यावरील माणसे दिसली नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.
चौकट
मृतांच्या नातेवाइकांना सत्तार यांच्याकडून मदत
सिल्लोड-भराडी रस्त्यावरील अपघातात मरण पावलेल्या गुलामनबी गणी पठाण(रा.मोढा खु.), शेख हमीद शेख अमीन(रा.मोबिनपूरा, सिल्लोड), शेख नईम मजीद (रा.जामा मस्जिद, सिल्लोड) या तिन्ही मयतांच्या कुटुंबांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैयक्तिक प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली आहे, तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
फोटो :