प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:24 PM2019-04-12T23:24:24+5:302019-04-12T23:25:26+5:30
: पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाण्याच्या कारणावरून प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघींनीही एकमेकींवर मारहाणीचा आरोप केला.
औरंगाबाद : पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाण्याच्या कारणावरून प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघींनीही एकमेकींवर मारहाणीचा आरोप केला.
आरोग्य विभागांतर्गत पडेगाव येथे नर्सिंग ट्रेनिंग सेंटर आहे. याठिकाणी विद्यार्थिनींचे वसतिगृहदेखील आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा टँकर येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहातही पाण्याचा तुटवडा आहे. विद्यार्थिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी वापरासाठी घरून पाणी आणण्याचा मुद्दा प्रभारी प्राचार्या किरण जाधव यांनी मांडला होता. याच मुद्यावरून शुक्रवारी जाधव आणि पाठ्य निर्देशिका सुनीता रायपुरे यांच्यात मारामारीचा प्रकार घडला. यात दोघींच्याही चेहºयावर दुखापत झाली. या घटनेनंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनी आणि किरण जाधव यांनी आरोग्य उपसंचालकांकडे धाव घेतली, तर सुनीता रायपुरे आणि परिचारिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी छावणी पोलीस ठाणे गाठले.
फक्त मत मांडले
चार ते पाच दिवसांपासून टँकर येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना पाणी कमी पडू नये, यासाठी कर्मचाºयांनी घरून बाटलीभर पाणी आणण्याचे फक्त मत मांडले होते. स्वच्छतागृहाचा वापर केलेला नसतानाही वाद घालत सुनीता रायपुरे यांनी मारहाण केली, असे प्रभारी प्राचार्या किरण जाधव यांनी सांगितले.
घरून पाणी आणा म्हणे
पाणी नसल्यामुळे विद्यार्थिनींनीच टँकर मागविले. त्यात किरण जाधव यांनी स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी घरून पाणी आणण्यास सांगितले. त्या स्वत: मात्र, स्वच्छतागृहाचा वापर करतात. याची विचारणा के ल्यानंतर त्यांनी मारहाण केली, असे पाठ्य निर्देशिका सुनीता रायपुरे यांनी सांगितले.
चौकशी समिती स्थापन
आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, या प्रकरणाची चौकशी क रण्यासाठी समिती स्थापन केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर अधिकारी नर्सिंग सेंटरला भेट देणार आहेत. संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.