- जयेश निरपळगंगापूर (औरंगाबाद) : अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातून गेली असताना त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. पिके बहरलेली आहेत. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
मागील दोन वर्षांपासून बरसणाऱ्या जोरदार पावसाने पाणीपातळी वाढली असून, विहिरींत पाणीसाठादेखील वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. थंडी गायब झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, रब्बीचा कांदा आदी पिकांवर रसशोषक किडी वाढल्याने शेतकरीवर्गाला चिंता भेडसावत आहे. तालुक्यात रब्बीच्या ६९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून कांदा व गहू पिकांच्या पेऱ्यात वाढ झाली आहे, तर ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. भरपूर पाऊस झाल्याने थंडीचे प्रमाण जास्त राहील, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन-तीन दिवसांपासून थंडी गायब झाल्याने उगवलेल्या रब्बी पिकांची वाढ खुंटली असून ती रसशोषक किडींच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे हंगाम पूर्व (आरास) पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. जास्तीची थंडी पडल्यास पिकांना लाभ होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडतो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
बळीराजाच्या खर्चात वाढढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजाला औषध फवारणीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. आधीच बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच औषध फवारणीचा खर्च अधिक येत असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
उत्पादनात घट होण्याची शक्यताहवामानामुळे गहू पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मावा, तुडतुडे तसेच गव्हाचा उतारा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यांनी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- सुरेश दंडे, शेतकरी, बाबरगाव.
रब्बीची तालुक्यात झालेली लागवड१) ज्वारी- ४५६९ हेक्टर२) गहू- ५२१८३) मका- १६२९४) हरबरा- ४५६९५) रब्बी कांदा- ११३०६) चारा पिके- १७१७७) भाजीपाला- २२०७