दिलासा ! जिल्ह्यात सोमवारी ५५० रुग्ण कोरोनामुक्त; ३८८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:37 PM2021-03-09T12:37:08+5:302021-03-09T12:39:17+5:30

corona virus जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ३५७ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ००९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Comfort! In the district on Monday 550 corona patients discharged; An increase of 388 patients | दिलासा ! जिल्ह्यात सोमवारी ५५० रुग्ण कोरोनामुक्त; ३८८ रुग्णांची वाढ

दिलासा ! जिल्ह्यात सोमवारी ५५० रुग्ण कोरोनामुक्त; ३८८ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारादरम्यान सोमवारी पाच जणांचा मृत्यू झालाजिल्ह्यात सध्या ३,०५२ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात ३८८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर तब्बल ५५० जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील चार आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३,०५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ३५७ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ००९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३८८ रुग्णांत मनपा हद्दीतील ३५७, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील तब्बल ५२४ आणि ग्रामीण भागातील २६, अशा एकूण ५५० रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना हर्सूल येथील भगतसिंगनगरातील ७६ वर्षीय पुरुष, वैजापूर तालुक्यातील तालखेड येथील ६५ वर्षीय स्त्री, सिल्लोड तालुक्यातील बिलालनगरातील ५८ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर २, एन-नऊ, श्रीकृष्णनगर १, समतानगर २, बन्सीलालनगर १, गादिया विहार ५, राज व्हॅली १, प्रतापनगर १, हर्षनगर १, गजानन मंदिर परिसर ४, रेल्वे कॉलनी १, पन्नालालनगर १, इटखेडा १, नागेश्वरवाडी २, बेगमपुरा १, कासलीवाल तारांगण ३, देवगिरी व्हॅली, पडेगाव १, मयूर पार्क १, एन-अकरा, नवजीवन कॉलनी १, एन-तेरा, भारतनगर १, जटवाडा रोड १, शिवेश्वर कॉलनी, हर्सूल १, एन-अकरा येथे ६, वीणा सो. ३, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ १, छत्रपतीनगर, बीड बायपास १, एन-दोन, रामनगर २, एन-तीन, सिडको १, उत्तरानगरी, चिकलठाणा १, सातारा परिसर २, बीड बायपास ७, राजेशनगर १, सारंग सो., गारखेडा परिसर १, टिळकनगर २, कैलासनगर १, मयूरबन कॉलनी १, गारखेडा ३, पुंडलिकनगर १, अलंकार सो., १, अय्यप्पा मंदिर १, निरमन सो., १, जालननगर १, आनंद विहार इटखेडा १, शहांगज २, शिवशंकर कॉलनी १, अंगुरीबाग १, विश्रामबाग कॉलनी १, पदमपुरा २, मिलियन पार्क सो., १, बजाजनगर १, कोमलनगर १, जयभवानीनगर ३, शिवाजीनगर ४, अरिहंतनगर १, मातोश्रीनगर १, देवानगरी १, नाथ प्रांगण १, देवळाई १, एन-आठ येथे १, एन-सात येथे १, एन-पाच, गुलमोहर कॉलनी १, रोशन गेट १, राणानगर १, कासलीवाल मार्वल, सातारा परिसर १, भगतसिंगनगर, हर्सूल १, उल्कानगरी ५, विद्यानगर, सेव्हन हिल १, भगवती कॉलनी १, जवाहर कॉलनी १, टीव्ही सेंटर २, एन-दोन, ठाकरेनगर १, रामकृपा हा. सो १, शहानूरवाडी ४, त्रिमूर्ती चौक १, बीड बायपास, देवळाई परिसर १, एन-अकरा, रवीनगर १, एन-सात शास्त्रीनगर २, भवानीनगर, जुना मोंढा २, विजयनगर, सातारा परिसर १, ज्ञानेश्वरनगर १, दत्तनगर २, मोहिरा चौक १, उस्मानपुरा २, न्यू बालाजीनगर २, दशमेशनगर १, हॉटेल प्लाजा, आरटीओ ऑफिसजवळ १, न्यू एसबीएच कॉलनी १, वेदांतनगर २, एन-चार, सिडको १, रामनगर १, मनीषा कॉलनी १, गजानननगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, जाधववाडी १, बालाजीनगर ३, एन-दोन, सिडको १, रेल्वे स्टेशन परिसर १, श्रेयनगर १, रोकडिया हनुमान कॉलनी १, वेदांतनगर, एमआयडीसी २, अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर २, कांचनवाडी १, जुना भावसिंगपुरा १, नूतन कॉलनी १, दत्त मंदिर परिसर, बीड बायपास १, म्हाडा कॉलनी, शहानूरवाडी २, बन्सीलालनगर ३, श्रीनिकेतन कॉलनी १, न्यू श्रेयनगर १, आनंद विहार, पैठण रोड १, एकनाथनगर १, लक्ष्मीनगर १, नागसेन कॉलनी १, आदित्यनगर, गारखेडा परिसर २, एसआरपीएफ कॅम्प परिसर १, अन्य १८४.

ग्रामीण भागातील रुग्ण
लासूर स्टेशन २, वाळूज २, रांजणगाव १, शिवना, सिल्लोड १, वडगाव को. १, बजाजनगर ५, सिडको महानगर एक २, अन्य १७.

Web Title: Comfort! In the district on Monday 550 corona patients discharged; An increase of 388 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.