कंत्राटी कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 08:37 PM2019-01-29T20:37:45+5:302019-01-29T20:38:26+5:30
महापालिकेचा पन्नास टक्के कारभार सध्या कंत्राटी कर्मचाºयांवर अवलंबून आहे. या कर्मचाºयांनी शंभर टक्के कामबंद केल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.
औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन आजही महापालिकेतर्फे सुरू आहे. या कामासाठी प्रत्येक रिक्षावर कंत्राटी पद्धतीने चालक नियुक्त केले आहेत. पाणीपुरवठ्यासाठीही १०० पेक्षा अधिक लाईनमन नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाºयांनी कामबंदचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
महापालिकेचा पन्नास टक्के कारभार सध्या कंत्राटी कर्मचाºयांवर अवलंबून आहे. या कर्मचाºयांनी शंभर टक्के कामबंद केल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांमध्ये मनपाने मोठ्या प्रमाणात आऊटसोर्र्सिंग केले. कचरा संकलन करण्यासाठी ३०० पेक्षा अधिक रिक्षा आहेत. महापालिकेच्या मालकीच्या शंभरपेक्षा अधिक रिक्षा आहेत. या रिक्षा चालविण्यासाठी मनपाने कंत्राटी पद्धतीवर चालक नियुक्त केले आहेत. चालकांची संख्याही १०० पेक्षा अधिक आहे. समांतर जलवाहिनीच्या कंपनीने पाणीपुरवठ्यासाठी १०० पेक्षा अधिक लाईनमन नियुक्त केले होते. मनपाकडे पाणीपुरवठ्याचा भार आल्यानंतर मनपाने कंपनीकडील सर्व लाईनमन कंत्राटी पद्धतीवर घेतले. अलीकडेच घनकचरा विभागासाठी ८० माजी सैनिक नेमण्यात आले. या कर्मचाºयांना मागील तीन महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही.
प्रशासनाकडे चार ते पाच महिन्यांपासून थकबाकी असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. कंत्राटदाराने आपल्या खिशातील पैसे टाकून दोन महिने कर्मचाºयांचा पगार केला. आता आमचीही क्षमता संपल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, मनपा प्रशासन कर्मचाºयांचा पगार करीत नसल्याने कर्मचाºयांनी मंगळवारी काम बंदचा इशारा संबंधित विभागाला दिला आहे.
संगणक आॅपरेटरचा पगारही लांबला
महापालिका मुख्यालय, वॉर्ड कार्यालयात खाजगी एजन्सीमार्फत १२५ पेक्षा अधिक संगणक आॅपरेटर नेमण्यात आले आहेत. या कर्मचाºयांनाही दोन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यास मनपाचा अर्ध्याहून अधिक कारभार ठप्प होण्याची भीती आहे.