औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या शंभरावर गेली. दिवसभरात ११३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील केवळ १४, तर ग्रामीण भागांतील ९९ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एक हजार ७३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार ६९४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १५ आणि ग्रामीण भागातील २१४, अशा २२९ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना चंदापूर, सिल्लोड येथील ४० वर्षीय महिला, करमाड येथील ७० वर्षीय महिला, सिडकोतील ५१ वर्षीय महिला, बिडकीन येथील ६० वर्षीय पुरुष, धानोरा, सिल्लोड येथील ३६ वर्षीय महिला, सिंदोळ, सोयगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, दौलताबाद येथील ५७ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ७५ वर्षीय पुरुष, कसाबखेडा, खुलताबाद येथील ६५ वर्षीय पुरुष, हडकोतील ६७ वर्षीय पुरुष, बन्सीलालनगरातील ६९ वर्षीय महिला आणि पेल्हारा, अकोला येथील ५९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णरेल्वेस्टेशन रोड १, राजनगर १, सावतानगर १, पुंडलिकनगर १, एन-४, सिडको १, मयूरपार्क, हर्सूल १, म्हाडा कॉलनी १, पुंडलिकनगर १, ज्योतीनगर १, अन्य ५.
ग्रामीण भागांतील रुग्णफुलंब्री १, ठाकरे चौक, ता. खुलताबाद २, पळशी १, ता. पैठण १, कमलापूर, रांजणगाव १, बजाजनगर ३, सिडको वाळूज ३, सांजूळ, ता. फुंलब्री १, गंगापूर १, पैठण १, अन्य ८४.