coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात २८३ कोरोनाबाधितांची भर, १२ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 09:14 PM2020-08-06T21:14:31+5:302020-08-06T21:17:03+5:30
आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ७७४ बाधित आढळून आले.
औरंगाबाद ः जिल्ह्यात २८३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर १११ बाधितांचा मृत्यु झाला. त्यात जिल्ह्यातील ९, जळगांव जिल्ह्यातील २, बीड येथील एकाचा मृतात समावेश आहे. दिवसभरात १५५ जणांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात ग्रामीण भागातील ३१ तर शहरातील १२४ जण उपचार पुर्ण होऊन घरी परतले.
आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ७७४ बाधित आढळून आले. त्यापैकी ११ हजार ६७६ जण उपचार पुर्ण होऊन घरी परतले. तर आजपर्यंत ५०९ जणांचा मृत्यु झाल्याने ३५८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ४५ , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५५ आणि ग्रामीण भागात ९५ रूग्ण आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
१२ बाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयात एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९, अरिहंत नगरातील ६१ वर्षीय महिला, गारखेडा परिसरातील ७३, सिडकोतील विश्वकर्मा कॉलनीतील ५२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात सात बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिऊर (ता. वैजापुर) येथील ८२ वर्षीय वृद्ध, पाडळी बोरगांव (ता. फुलंब्री) येथील ५१ वर्षीय पुरुष, शिवनगर कन्नड येथील ७४ वर्षीय पुरुष, संघर्षनगर मुकुंदवाडी येथील ५३ वर्षीय महिला, चाळीसगांव येथील ६८ वर्षीय पुरुष, जळगांव येथील ५० वर्षीय पुरुष तर गजानन नगर बीड येथील ४३ वर्षीय बाधितांचा मृतांत समावेश आहे. आतापर्यंत एकुण मृतांची संख्या ५०९ झाली आहे.
शहर प्रवेशावेळी आढळले ४५ रुग्ण
नक्षत्रवाडी १, एकनाथ नगर १, पडेगाव १, उस्मानपुरा १, वाळूज एमआयडीसी १, कोकणवाडी १, प्रकाश नगर १, राम नगर २, चिकलठाणा १, कुंभेफळ १, गणोरी १, राजे संभाजी नगर १, शेंदूर्णी २, नारेगाव १, रोजेबाग १, जाधववाडी २, अरिहंत नगर १, शिवना २, एन सात १, हर्सूल २, एन बारा १, मातोरा १, चितेगाव २, नक्षत्रवाडी २, गंगापूर १, इटखेडा १, केसापुरी १, गणेश कॉलनी १, ढोरकिन १, वळदगाव १, बालाजी नगर १, सिडको महानगर १, द्वारका नगर २, गारखेडा १, जय भवानी नगर १, पडेगाव १, मिटमिटा १.
मनपा हद्दीत ६५ रुग्ण
एन सहा सिडको १, बन्सीलाल नगर १, क्रांती नगर ४, मिलिट्री हॉस्पीटल, छावणी १, सिडको एन पाच, श्री नगर १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, प्रकाश नगर ३, समृद्धी नगर,एन चार सिडको १, मुकुंदवाडी १, औरंगपुरा २, संभाजी कॉलनी,एन सहा सिडको १, संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी १, मल्हार चौक, गारखेडा १, कांचनवाडी १, शिवशंकर कॉलनी २, बालाजी नगर १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, शिवनेरी कॉलनी १, विष्णू नगर, आकाशवाणी १, न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर १, एस टी कॉलनी, फाजिलपुरा १, एन नऊ, पवन नगर २, मातोश्री नगर, पुंडलिक नगर १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, नागेश्वरवाडी १, राजा बाजार १, कर्णपुरा, छावणी परिसर १, अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा २, अन्य १, शंकुतला नगर, गादिया कॉलनी १, गारखेडा परिसर १, लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर १, प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा १, ब्ल्यू बेरी २, वृंदावन कॉलनी १, गरम पाणी १, शमी कॉलनी १, अन्य ५, विश्वकर्मा सो., एन आठ, सिडको १, कोहिनूर कॉलनी १, संघर्ष नगर १, घाटी परिसर २, आलमगीर कॉलनी १, अन्य २, बालाजी नगर १, सिडको एन अकरा ४.
ग्रामीण भागात २३ रुग्ण
बाजार गल्ली, अब्दीमंडी १, आयोध्या नगर, बजाज नगर २, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर ३, जय हिंद चौक, बजाज नगर १, गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर १, शफेपूर, कन्नड १, पिंप्री राजा १, सारंगपूर, गंगापूर १, खंडाळा १, खालचा पाडा, शिवूर ९, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी १, शास्त्री नगर, सिल्लोड १.