coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी ५ रुग्णांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ५७१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 02:18 PM2020-08-13T14:18:42+5:302020-08-13T14:20:29+5:30

जिल्ह्यात १०५ रुग्णांचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह आले.

coronavirus: 5 more corona patients die in Aurangabad district; Corona death toll rises to 571 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी ५ रुग्णांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ५७१ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी ५ रुग्णांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ५७१ वर

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७, ७३७ एवढी झाली आहे.सध्या ४१६८ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यातील ५ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ५७१ झाली आहे.

शांतीपुरा-छावणी येथील ६५ वर्षीय पुरुष, नांदर-औरंगाबाद येथील ८० वर्षीय पुरुष, पानवडोद-सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, समतानगर-सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर, सिडको येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.

आज १०५ बाधितांची वाढ 
जिल्ह्यात १०५ रुग्णांचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७, ७३७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२, ९९८ रूग्ण बरे झाले आहेत. तर ५७१ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१६८ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: coronavirus: 5 more corona patients die in Aurangabad district; Corona death toll rises to 571

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.