coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ९६ कोरोनाबाधितांची वाढ, ४ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:50 AM2020-08-07T10:50:50+5:302020-08-07T10:53:10+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० झाली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील ९६ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर चार बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरूष, सिडकोतील ६२ वर्षीय महिला, बजाज नगरातील ५७ वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय महिला कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० झाली आहे. त्यापैकी ११ हजार ६७६ बरे झाले तर ५१३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३ हजार ६८१ जणांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीत ७४ रुग्ण
समृद्धी नगर एन चार सिडको ३, भानुदास नगर २, नारेगाव १, मधुरा नगर १, मयूर नगर १, मोची गल्ली २, क्रांती नगर १, रोकडा हनुमान कॉलनी २, जालान नगर, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर, सूतगिरणी रोड २, न्यू गणेश नगर, अहिल्या नगर चौक १, एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको १, सैनिक नगर, पडेगाव रोड १, नक्षत्रवाडी १, शिवाजी नगर १, देशमुख नगर, गारखेडा १, मोचीवाडा, पद्मपुरा १, एकनाथ नगर १, उस्मानपुरा १, कर्णपुरा १, होनाजी नगर, जटवाडा रोड १, श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी १, जय भवानी नगर ५, बालाजी नगर २, मिल कॉर्नर १, उल्कानगरी, गारखेडा १, विद्यानिकेतन कॉलनी १, एन सात, अयोध्या नगर ७, ब्रिजवाडी ३, माणिक नगर, नारेगाव ३, एन दोन, जे सेक्टर २, गोलवाडी १, राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर २, सौजन्य नगर १, स्वराज नगर १, शिवशंकर कॉलनी १, बुद्ध नगर ४, घाटी परिसर १, अनय् ६, भावसिंगपुरा २, छावणी परिसर १, गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा १.
ग्रामीण भागात २२ रुग्ण
खुलताबाद १, गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी, बजाज नगर १, पोलिस स्टेशन परिसर, वाळूज २, ओमसाई नगर, जोगेश्वरी २, लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव १, फुलंब्री भाजी मंडई परिसर २, स्नेह नगर,सिल्लोड १, सिल्लोड उपविभागीय रुग्णालय परिसर १, शिवाजी नगर,सिल्लोड १, टिळक नगर,सिल्लोड २, भराडी,सिल्लोड २, बोरगाव बाजार, सिल्लोड १, करमाड ४.