coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १७ हजार ४१२ वर; आज १०८ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 09:54 AM2020-08-12T09:54:51+5:302020-08-12T09:56:39+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १२, ८३३ रूग्ण बरे झाले आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यातील १०८ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७,४१२ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२, ८३३ रूग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४०१७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यातील भागनिहाय नवे रुग्ण
मनपा- ८७
एन अकरा, दीप नगर १, गजानननगर १, अन्य २, नागेश्वरवाडी १, हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी १, दिशा संस्कृती, पैठण रोड १, एन सात, पोस्ट ऑफिस जवळ १, पारिजातनगर, जयभवानीनगर, सिडको १, भिमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड १, संग्राम नगर, सातारा परिसर ४, शिवाजीनगर २, श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको १, चोपडे वसती, सातारा परिसर १, सह्याद्री हिल, शिवाजीनगर २, गणेश कॉलनी ३, पडेगाव १, नवाबपुरा ३, सिद्धार्थनगर २, एन बारा, छत्रपतीनगर २, छावणी १, सिडको १, सिंधी कॉलनी १, जयभवानीनगर ४, श्रीराम नगर, गारखेडा १, बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा १, रामनगर २, प्रकाशनगर, मुकुंदवाडी १, टीव्ही सेंटर ३, राधास्वामी कॉलनी, हर्सुल २, झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ १, बीड बायपास २, बालाजीनगर ४, नाथनगर ३, सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा १, औरंगपुरा १, टिळकनगर २, सराफा परिसर २, एन अकरा ४, एन चार सिडको २, एन एक सिडको १, हर्सुल टी पॉइंट ३, नक्षत्रवाडी १, मिलिट्री हॉस्पीटल १, एन पाच सिडको १, चिकलठाणा १, एकनाथनगर १, विजयनगर ६ गारखेडा परिसर १, श्रीकृष्ण नगर १
ग्रामीण- २१
साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ १, अर्बन व्हॅली जवळ, बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, कुंभेफळ ३, देऊळगाव बाजार,सिल्लोड २, जयभवानीनगर, सिल्लोड १, शिवना, सिल्लोड २, खंडाळा, वैजापूर ७, विनायक कॉलनी, वैजापूर १, जीवनगंगा वैजापूर १, खालचा पाडा, शिवूर १