सिल्लोड येथे मतमोजणी शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:17+5:302021-01-19T04:07:17+5:30
१५ टेबलांवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या नियंत्रणात, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ...
१५ टेबलांवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या नियंत्रणात, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी नायब तहसीलदार संजय सोनवणे, किरण कुलकर्णी व विनोद करमनकर यांच्या अधिपत्याखाली १५ टेबलांवर २३ फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आली. यासाठी महसूल विभागाच्यावतीने मतमोजणीच्या कामासाठी तब्बल २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
कडक पोलीस बंदोबस्त
मतमोजणीच्या परिसरात प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक पूजा गायकवाड यांच्या नियंत्रणात पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सपोनि नालंदा लांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे, बालाजी ढगारे यांच्यासह राज्य राखील दल तैनात करण्यात आला होता.
(कॅप्शन : सिल्लोड येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी झाली. यावेळी जल्लोष करताना कार्यकर्ते दिसत आहेत.