मोटारसायकल चोराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:02 AM2021-01-17T04:02:06+5:302021-01-17T04:02:06+5:30

=============== दोन संशयितांना अटक औरंगाबाद : पैठण लिंक रोडवर पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना गस्तीवरील सातारा ...

Crime against motorcycle thieves | मोटारसायकल चोराविरुद्ध गुन्हा

मोटारसायकल चोराविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

===============

दोन संशयितांना अटक

औरंगाबाद : पैठण लिंक रोडवर पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना गस्तीवरील सातारा पोलिसांनी १४ जानेवारीच्या रात्री अटक केली. इमरान मन्ना सय्यद आणि सागर संतोष सोनवणे (दोघे रा. गेवराई तांडा) अशी संशयितांची नावे आहेत.

====================

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

औरंगाबाद : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संचालकाने विनयभंग केला आणि तिच्या दोन मैत्रिणींना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना टीव्ही सेंटर परिसरात दि. १४ रोजी सकाळी ७.३० वाजेदरम्यान घडली. याविषयी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात शिवराणा अकॅडमीचा संचालक सचिन राजपूत, त्याचा भाऊ आणि दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदविला. तक्रारदार तरुणी दि. १४ रोजी सकाळी ७.३० वाजता मैत्रिणीसह पोलीस भरतीची तयारी करून जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या सचिन राजपूतने दुचाकीची धडक दिली. यावेळी टायर पोटरीला लागल्याने तिने त्याला जाब विचारला असता आरोपीने तिला शिवीगाळ करून विनयभंग केला. तिच्या मैत्रिणीला धमकावले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली.

=========================,

विवाहितेच्या छळाचा पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा

औरंगाबाद : प्रोझोन मॉलमध्ये मुख्य कार्यालय टाकण्यासाठी माहेरून ६५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या तीनजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. महिलेचा पती अजहर पठाण अफजल पठाण (वय ३४), सासरा अफजल पठाण आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Crime against motorcycle thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.