गुन्हा दाखल होऊन महिना झाला; राज्यमंत्री दिलीप कांबळे फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:13 PM2019-04-12T23:13:36+5:302019-04-12T23:13:55+5:30

: विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होऊनही राज्यमंत्री दिलीप कांबळे पोेलिसांना सापडत नसल्याची स्थिती आहे. पोलिसांच्या लेखी कांबळेंसह अन्य आरोपी फरार आहेत. महिनाभरात पोलीस एकाही आरोपीला अटक करु नाहीत.

 The crime took place a month ago; Minister of State Dilip Kamble Falchar | गुन्हा दाखल होऊन महिना झाला; राज्यमंत्री दिलीप कांबळे फरारच

गुन्हा दाखल होऊन महिना झाला; राज्यमंत्री दिलीप कांबळे फरारच

googlenewsNext
ठळक मुद्देदोन कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण: दारु विक्री दुकानाचे लायसन्स देण्याचे आमिष

औरंगाबाद : विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होऊनही राज्यमंत्री दिलीप कांबळे पोेलिसांना सापडत नसल्याची स्थिती आहे. पोलिसांच्या लेखी कांबळेंसह अन्य आरोपी फरार आहेत. महिनाभरात पोलीस एकाही आरोपीला अटक करु नाहीत.
दिलीप काशीनाथ काळभोर (रा. लोणीभोर, ता. हवेली, जि. पुणे), दयानंद उजलू वनंजे (रा. नांदेड), सुनील जबरचंद मोदी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि राज्यमंत्री कांबळे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने सिडको ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा नोंद आहे. खुलताबाद तालुक्यातील रहिवासी विलास दादाराव चव्हाण यांनी यासंबंधी तक्रार दिली होती. २०१५ साली काळभोर याने विलास चव्हाण यांना मंत्रालयातील ओळखीतून आणि एजंटामार्फत दारु दुकानाचे लायसन्स मिळवून देतो, असे सांगितले
काळभोर याने त्यांच्या ओळखीचे आरोपी वनजे, मोदी यांच्यामार्फत तत्कालीन उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासोबत विलास चव्हाण यांची भेट करून दिली. मुंबईतील बंद पडलेल्या एका दारू दुकानाचे लायसन्स हस्तांतरित करून देण्यासाठी आरोपींनी त्यांना तब्बल २ कोटी १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून आॅक्टोबर २०१५ ते २० मे २०१८ या कालावधीत चव्हाण यांनी तब्बल १ कोटी ९२ लाख रुपये आरोपींना दिल्याचे तक्रारीत नमूद केले.
राज्यमंत्री कांबळेंसह अन्य चौघांविरुध्द मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर काळभोरला अटकपूर्व जामीन जिल्हा आणि उच्च न्यायालयाने नाकारला. मात्र काळभोरलाही अटक झालेली नाही.
मंत्री कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कांबळे यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही कांबळे यांच्यावर कारवाईसंदर्भात पोलिसांकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसत आहे.
सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना कांबळे यांच्या अटकेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी केवळ आमचा तपास चालू आहे, एवढेच उत्तर दिले.
गुन्ह्यातील आरोपीमध्ये मंत्र्याचे नाव असल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला नाही. महिनाभरात एकाही आरोपीला पोलीस अटक करू शकले नाहीत. आरोपी काळभोरला न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे त्यालाही पोलिसांनी अटक केलेली नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यमंत्री कांबळे यांचे नाव गुन्ह्यामध्ये असल्याने स्थानिक पोलिसांवर मुंबईतून दबाव आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाई मंदावली आहे.

कोट...
स्वतंत्र तपास पथक
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांना वाटेल तेव्हा आरोपींच्या अटकेची परवानगी दिली जाईल.
सध्या सर्व आरोप फरार आहेत.
- डॉ. राहुल खाडे, पोलीस उपायुक्त, औरंगाबाद.

Web Title:  The crime took place a month ago; Minister of State Dilip Kamble Falchar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.