सायबर भामट्यांनी व्यवस्थापकाचा ईमेल आयडी हॅक करुन साडेपाच लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 08:04 PM2021-01-08T20:04:17+5:302021-01-08T20:06:34+5:30

Cyber crime वाळूज उद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंगची फसवणूक

Cyber hackers hacked the manager's email ID and stole Rs 1.5 lakh | सायबर भामट्यांनी व्यवस्थापकाचा ईमेल आयडी हॅक करुन साडेपाच लाख पळवले

सायबर भामट्यांनी व्यवस्थापकाचा ईमेल आयडी हॅक करुन साडेपाच लाख पळवले

googlenewsNext
ठळक मुद्देउद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंग या कंपनीत स्टीलचे उत्पादन करण्यात येते. मटेरियल्स पुरविणाऱ्या कंपनीला पैसे मिळाले नसल्याने फसवणूक उघडकीस

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंग कंपनीच्या व्यवस्थापकाचा ईमेल आयडी हॅक करुन बनावट ईमेल आयडीद्वारे साडे पाच लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अनोळखी भामट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंग या कंपनीत स्टीलचे उत्पादन करण्यात येते. तीन महिन्यापूर्वी कंपनीला लागणाऱ्या मटेरियल्सची आयात करण्यासाठी कंपनीकडून हैद्राबादच्या केएसटी इस्पात या कंपनीला ऑर्डर देण्यात आली होती. मात्र आगाऊ रक्कम मिळाल्याशिवाय हैद्राबादची कंपनी मटेरियल्स पाठवित नसल्याने वर्षा फोर्जिंग कंपनीत खरेदी विभागात काम करणारे व्यवस्थापक फजल खान यांनी मटेरियल पुरविणाऱ्या कंपनीचे बँक डिटेल्स घेऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मटेरियल्स खरेदी संदर्भात वर्षा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातरजमा केल्यानंतर मटेरियल्स खरेदीस मंजुरी दिली होती. यानंतर व्यवस्थापक फजल यांनी २२ ऑक्टोबरला मटेरियल्स पुरवठा करणाऱ्या हैद्राबाद येथील कंपनीच्या बँक खात्यावर १२ लाख ४७ हजार ८५० रुपये जमा केल्यानंतर वर्षा फोर्जिंग कंपनीच्या खात्यावरुन मटेरियल्सची रक्कम कपात झाली होती. दरम्यान, व्यवस्थापक फजल खान यांनी मटेरियल्स पुरविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.

ईमेल आयडी हॅक करून फसवणूक 
वर्षा फोर्जिंग कंपनीच्या वरिष्ठांनी केलेल्या चौकशीत फजल खान यांचे ईमेल आयडी भामट्याने हॅक करुन बनावट ईमेल आयडी तयार करुन परस्पर पैसे लांबविल्याचे समोर आले. कंपनीच्या खात्यातून कपात झालेले १२ लाख ४७ हजार ८५० रुपये हे लखनऊ येथील अलाहाबाद बँकेचे खातेदार राजेश्वरसिंग याच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे चौकशीत समोर आले. कंपनीने तक्रार केल्यानंतर राजेश्वरसिंग यांचे बँक खाते गोठविण्यात आले. मात्र तोपर्यंत राजेश्वरसिंग याने जवळपास साडेपाच लाख रुपये विविध खात्यावर ट्रान्सफर करुन काही रक्कम दिल्लीत एटीएमद्वारे काढून घेतली. कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक ऋषिकेश हमदापूरकर यांच्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हे तपास करीत आहे.
 

Web Title: Cyber hackers hacked the manager's email ID and stole Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.