-----------------------------
साजापूरातून ज्येष्ठ महिला बेपत्ता
वाळूज महानगर : साजापूरातून ६५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. अयोध्या भास्कर सोनवणे (६५) यांचा सुनेसोबत वाद झाल्याने त्या रविवार (दि.१४) घरातून निघून गेल्या आही. त्यांचा शोध न लागल्याने भास्कर सोनवणे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
---------------------------------
भाजीमंडईत वाहने रस्त्यावर
वाळूज महानगर : भाजीपाला खरेदीसाठी पंढरपूरच्या भाजी मंडईमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बहुताश ग्राहक दुचाकी व चारचाकी वाहने भाजी मंडईसमोरील रस्त्यावर उभी करतात. या वाहनामुळे रस्ता अरुंद झाला असून सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.
--------------------------------
वाळूजला विजेचा लंपडाव
वाळूज महानगर : वाळूजला सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे ग्राहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज सकाळी अविनाश कॉलनी, दत्त कॉलनी, शिवाजीनगर आदी भागातील वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत केला जातो. परिसरात अखंड वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.
-------------------------------
उद्योगनगरीत हातगाड्यांचे अतिक्रमण
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत ठिकठिकाणी हातगाड्यांचे अतिक्रमण वाढले आहे. या परिसरातील कामगार चौक, एफडीसी चौक, एनआरबी चौक, रांजणगाव फाटा आदी चौकात हातगाडीवर व्यवसाय करणाºयांनी अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, याकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कामगार व वाहनधारकांत नाराजी आहे.
-----------------------------