कर्जबाजारी शेतकऱ्याने दिला विहिरीत जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:02 AM2021-08-15T04:02:26+5:302021-08-15T04:02:26+5:30

कौतिक जाधव यांना उदरनिर्वाहासाठी केवळ एक एकर शेती आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध अडचणींचा सामना करावा ...

Debt-ridden farmer gave well life | कर्जबाजारी शेतकऱ्याने दिला विहिरीत जीव

कर्जबाजारी शेतकऱ्याने दिला विहिरीत जीव

googlenewsNext

कौतिक जाधव यांना उदरनिर्वाहासाठी केवळ एक एकर शेती आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीसाठी बँक, सोसायटी व बचत गटाचे कर्ज काढून शेती आणि कुटुंबाचा गाडा ते हाकत होते. मात्र या वर्षीने पावसाने हुलकावणी दिल्याने ते हतबल झाल्याने तणावात होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी ते घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील विहिरीत आढळून आला. याबाबत वडोद बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून कौतिक जाधव यांचा मृतदेह फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. येथे मृतदेहाचे शवविछेदन केल्यानंतर उमरावतीत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

140821\20210814_171209.jpg

फोटो ओळ:आत्महत्याग्रस्त कौतिक जाधव छायाचित्र.

Web Title: Debt-ridden farmer gave well life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.