कौतिक जाधव यांना उदरनिर्वाहासाठी केवळ एक एकर शेती आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीसाठी बँक, सोसायटी व बचत गटाचे कर्ज काढून शेती आणि कुटुंबाचा गाडा ते हाकत होते. मात्र या वर्षीने पावसाने हुलकावणी दिल्याने ते हतबल झाल्याने तणावात होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी ते घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील विहिरीत आढळून आला. याबाबत वडोद बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून कौतिक जाधव यांचा मृतदेह फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. येथे मृतदेहाचे शवविछेदन केल्यानंतर उमरावतीत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
140821\20210814_171209.jpg
फोटो ओळ:आत्महत्याग्रस्त कौतिक जाधव छायाचित्र.