औरंगाबाद : सिडको टाऊन सेंटर येथे एलआयसी कार्यालयात कुरिअर आणण्यासाठी गेल्याचा फायदा घेऊन डिलिव्हरी बॉयने अमेझॉनवरून आलेल्या ६५ हजारांचे ५८ नग (वेगवेगळ्या वस्तू) पळवून नेल्याची घटना घडली. फसवणूक झाल्याप्रकरणी दहा दिवसांनंतर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी गंगाधर राठोड (२९, रा. सुरेवाडी, जाधववाडी) यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. आॅनलाईन आलेल्या वस्तंूची पोहोच करण्यासाठी त्यांच्याकडे काही मुले काम करतात. आरोपी अमोल परमानंद तांगडे (रा. माळखेड, ता. जि. बुलडाणा) हा नव्यानेची एनटेक्स ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिस प्रा. लि. कंपनीत अमेझोॉन कंपनीच्या पार्सल डिलिव्हरी करण्याचे काम करीत होता. राठोड व तांगडे हे एलआयसी टाऊन सेंटर येथे पार्सल देऊन परत येतो, तू येथेच थांब असे सांगून राठोड कार्यालयात गेले. हीच संधी पाहून त्या मुलाने बॅग घेऊन पळ काढला.
राठोड परत आले तेव्हा तो डिलिव्हरी बॉय व बॅग दिसून आली नाही. त्या बॅगेत मोबाईल, टॅब्लेट, पेन ड्राईव्ह, हेडफोन, कपडे, सौंदर्य प्रसाधने, हातातील घड्याळ, कॉलेज बॅग, व्हॉयलेट, कंबरेचा बेल्ट, एलईडी लाईट इत्यादी साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. राठोड करीत आहेत.