गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करून आणखी भर टाकली आहे. याने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. त्यामुळे खताच्या किमती तत्काळ कमी करण्यात याव्या, तसेच फुलंब्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण होत नाही. ज्या ठिकाणी मोजकाच लसीचा साठा प्राप्त होत असल्याने नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे नव्या दमाने लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. तहसीलदार शीतल राजपूत यांच्याकडे निवेदन देताना कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, पुंडलीक जंगले, मुद्दत्सर पटेल, ज्ञानेश्वर जाधव, बाबूराव डकले, सुनीता मारग, नामदेव पायगव्हाण, गोविंद गायकवाड, अंबादास गायके यांची उपस्थिती होती.
फोटो : फुलंब्री तहसीलदारांना निवेदन देताना कॉंग्रेसचे तालुका पदाधिकारी.