खून,अत्याचार एवढे वाढले का ? हर्सूल कारागृहात जागा पुरेना, क्षमतेपेक्षा जास्त बंदी

By सुमित डोळे | Published: August 26, 2023 12:12 PM2023-08-26T12:12:39+5:302023-08-26T12:12:53+5:30

हर्सुल कारागृहाची क्षमता १ हजार २१४, प्रत्यक्षात १ हजार ५७६ बंदी पैकी, ६२ दोषसिद्ध झालेल्या महिला गुन्हेगारही

Did murder and torture increase so much? There is not enough space in the Hersul District Jail | खून,अत्याचार एवढे वाढले का ? हर्सूल कारागृहात जागा पुरेना, क्षमतेपेक्षा जास्त बंदी

खून,अत्याचार एवढे वाढले का ? हर्सूल कारागृहात जागा पुरेना, क्षमतेपेक्षा जास्त बंदी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अट्टल गुन्हेगारांसह अनेकदा क्षणिक रागातून झालेल्या चुकीमुळे अनेक तरुणांच्या वाट्याला कारागृहाची शिक्षा वाट्याला येते. परंतु, गुन्ह्यांच्या वाढती टक्केवारीचा परिणाम आता कारागृहाच्या क्षमतेवरही होत आहे. कारागृह स्थापनेपासून कारागृहाची आस्थापना व क्षमता न वाढणे हा प्रश्न भविष्यात गंभीर स्वरूपाचा होईल, अशी चिंता कारागृह अधिकारी व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात एकूण ९ मध्यवर्ती तुरुंग
-३१ जिल्हा तुरुंग, १९ खुले तुरुंग
-१ खुली वसाहत आणि १७२ उप-तुरुंगांचा समावेश
-पुणे, मुंबईत महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग
-पुणे, अकोल्यात महिलांसाठी खुले तुरुंग.

हर्सुल मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १ हजार २१४, प्रत्यक्षात १ हजार ५७६

प्रकार             पुरुष             स्त्री
अधिकृत क्षमता १ हजार १५३ ६१
प्रत्यक्ष बंदी १ हजार ५१४ ६२

८६० दोष सिद्ध
कारागृहातील बंद्यापैकी ८२३ पुरुष बंद्यांवर गुन्हा सिद्ध झाला असून ३७ महिला सिद्ध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत, तर ६४० पुरुष व २५ महिला कच्चे बंदी आहेत.

खुल्या कारागृहात ४४३ बंदी
पैठण व औरंगाबाद येथे खुले कारागृह असून पैठण खुले कारागृहात ५०० बंदीक्षमतापैकी ४४३ दोष सिद्ध बंदी शिक्षा भोगत आहेत, तर औरंगाबाद खुले कारागृहात ४८ बंदी आहेत.

सर्वाधिक कैदी खुनातील
सूत्रांच्या माहितीनुसार, हर्सुल कारागृहात सर्वाधिक बंदी खुनाच्या गुन्ह्यातील आहेत. २० ते ४५ वयोगटातील सर्वाधिक गुन्हेगार आहेत. शिवाय, सातत्याने लूटमार, दरोडा, चोरी, अवैध व्यवसायप्रकरणी ५१ स्थानबद्ध गुन्हेगार बंदिस्त आहेत. खुनापाठाेपाठ दंगल, बलात्कारातील बंदी सर्वाधिक आहेत. देशविघातक कृत्यात सहभागीचा ठपका लागून शिक्षा लागलेले गुन्हेगारदेखील हर्सुल कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

चूक झाली पण शिक्षणाचा ध्यास कायम
संतापाच्या भरात चूक झाली तरी शिक्षा मात्र अटळ ठरते. कारागृहात बंद्यांना सुधारणेसाठी वाव दिला जातो. एक प्रशस्त ३ हजार पुस्तकांचे ग्रंथालय कारागृहात आहे.
-बंद्यांमध्ये १८५ बंदी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून, तर ८६ बंदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी दोन शिक्षक नियुक्त असून सर्व शिक्षण विनामूल्य असते.

Web Title: Did murder and torture increase so much? There is not enough space in the Hersul District Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.