औरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी योगा, धान्य धारणा कक्षाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी उद््घाटक मिताली लाठी, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मा बकाल, डॉ. भारती नागरे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. आश्विन पाटील, डॉ. कांबळे, डॉ. महेश मरकड, डॉ. मनोहर वाकळे, सुरेखा नाईक, सुजाता मोरे आदी उपस्थित होते.कनिष्ठ निवासी डॉक्टरांनाविद्यावेतनाची प्रतीक्षाऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अनेक कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे घाटीत रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांनाच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांची भेट घेतली. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विद्यावेतनाचे बिल सादर करण्याची सूचना केली; परंतु तीन दिवस उलटूनही डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. आगामी दोन दिवसांत विद्यावेतन दिले जाईल, असे डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात ध्यान धारणा क क्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:34 PM