जि. प. शालेय परिसर बनला मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:35 AM2017-10-04T00:35:53+5:302017-10-04T00:35:53+5:30
शहरातील जिल्हा परिषद कन्या व बहुविध प्रशालेय प्रांगणात रात्रीच्यावेळी मद्यपी दारू ढोसत बसतात. त्यामुळे शालेय परिसरात दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून येत आहेत. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जिल्हा परिषद कन्या व बहुविध प्रशालेय प्रांगणात रात्रीच्यावेळी मद्यपी दारू ढोसत बसतात. त्यामुळे शालेय परिसरात दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून येत आहेत. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शालेय परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी दारू पित बसतात. रात्री घातलेला गोंधळ व अस्ताव्यस्त दारूच्या बाटल्या मात्र जाग्यावरच राहतात. पहाटे शाळेत येणाºया विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. शहरात लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी इतरत्र मैदान नाही. त्यामुळे येथील मैदानावर खेळाडूंची गर्दी होते. परिसरातील दारूच्या बॉटल्या व कचºयाची साफसफाई खेळाडू करतात. पूर्वी कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी येथील प्रकार थांबावा याबाबत पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिले होते. याची दखल घेत हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई करून रात्री दारू पित बसणाºयांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती. परंतु हे चित्र पुन्हा बघावयास मिळत आहे. याकडे शिक्षणाधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी येथील नागरिक, पालकांतून होत आहे. पूर्वी केलेली कारवाईची मोहीम पोलिसांनी परत राबविल्यास मद्यपींची मैफल बसणार नाही.
दोन महिन्यांपूर्वी जि. प. कन्या शाळेचे कुलूप तोडून सामान लंपास करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो फसला. तर येथून चार दिवसांपूर्वीच दुचाकी चोरीस गेल्याचीही घटना घडली. या प्रकारामुळे मात्र शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.