कारणे सांगायला बैठकीत येता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:48 AM2018-06-19T00:48:34+5:302018-06-19T00:49:44+5:30
शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी म्हणून महापौर नंदकुमार घोडेले दर महिन्याला आढावा घेतात. मागील पाच बैठकांपासून अधिकारी निव्वळ कारणे दाखवून मोकळे होत आहेत. एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यापुढे बैठकांमध्ये कारणे सांगितली तर थेट कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी म्हणून महापौर नंदकुमार घोडेले दर महिन्याला आढावा घेतात. मागील पाच बैठकांपासून अधिकारी निव्वळ कारणे दाखवून मोकळे होत आहेत. एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यापुढे बैठकांमध्ये कारणे सांगितली तर थेट कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.
सोमवारी सकाळी महापौर दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सफारी पार्क, सातारा, देवळाई येथील पाण्यासाठी डीपीआर, ड्रेनेजचा डीपीआर, बाळासाहेब ठाकरे स्मारक, वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा आदी अनेक कामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणे दाखविण्यास सुरुवात केली. सातारा, देवळाई भागात आणीबाणी कायद्याद्वारे निधी मंजूर करून तीन महिने झाले. आजपर्यंत दिवे लावण्यात आलेले नाहीत. आणीबाणीत निधी मंजूर करून देण्याचा अर्थ काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वॉर्डात फक्त रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांशिवाय अधिका-यांना दुसरे कामच नाही. पूर्वीप्रमाणे कचरा प्रश्न पाहण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत. आता कचºयाचा ताणही अधिका-यांवर राहिलेला नाही. सांगितलेली कामे का होत नाहीत. कामे करायचीच नाहीत, असे ठरविले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून यापुढे बैठकीला येताना कारणे अजिबात चालणार नाहीत, असा सज्जड दमही महापौरांनी भरला.