बजाजनगरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:15 PM2019-09-05T23:15:27+5:302019-09-05T23:15:51+5:30
बजाजनगरात गुरुवारी (दि.५) ड्रेनेजचे चेंबर चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत होते.
वाळूज महानगर: बजाजनगरात गुरुवारी (दि.५) ड्रेनेजचे चेंबर चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत होते. रस्त्यावर घाण पाणी साचल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करत पाण्यातूनच ये-जा करावी लागली.
येथील ड्रेनेजलाईनचे काम अर्धवट असल्याने ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्यास अडचण होत आहे. त्यामुळे ड्रेनेजचे चेंबर सतत चोकअप होत असून, घाण पाणी रस्त्यावर साचत आहे. गुरुवारी आंबेडकर चौक ते कोलगेट चौक अंतर्गत रस्त्यावर ड्रेनेजचे चेंबर चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत होते.
या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागली. घाण पाण्याच्या उग्र वासामुळे मळमळ, उलटी, डोकेदुखी आदीचा त्रास हसन करावा लागत असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याविषयी अनेकवेळा सांगूनही याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.