औरंगाबाद: अतिपावसामुळे मूग, उडीद खराब झाल्यामुळे यंदा डाळींचे भाव कडाडले आहेत. तसेच यंदा विदेशातून हरबऱ्याच्या आयातीवर परिणाम झाला. त्यात धोंड्याच्या महिन्यात पुरणाला महत्त्व असल्याने हरभरा डाळीलाही मागणी वाढली आहे. परिणामी डाळींचे भाव किलो मागे ६ ते १० रुपयांनी वाढले आहेत.
मागील आठवड्यात ८४- ८६ रू या दराने मिळणारी हरबरा डाळ या आठवड्यात ९६-९८ रूपयाने मिळते आहे. उडीद डाळीचा भाव ९०- ९२ रूपयांवरून १०८- ११० रू. झाला असून मूग डाळ ९०- ९२ रूपयांवरून ९६- ९८ रूपये एवढी वधारली आहे. तर मठाची डाळ ११०- ११२ रूपये, मसूर डाळ ७८- ८० रू. तर बेसन ८६-९० प्रतिकिलो झाले आहे.