लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : ई-नाम प्रकल्पासाठी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत शेतीमालाचा लिलाव आॅनलाईन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना राष्टÑीय स्तरावरील बाजारपेठ मिळणार आहे. या ई-नाम प्रकल्पाचे बुधवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.बुधवारी वसमत बाजार समितीच्या सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार ज्योती पवार, सभापती राजेश पाटील इंगोले, अशोक अडकिणे, सुधीर मेहत्रे, खिस्ते, सचिव सोपान शिंदे आदींसह संचालक व व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाºयांनी ई-नाम प्रकल्पाची माहिती देवून शेतकºयांना होणारे लाभ सांगितले. शेतकºयांच्या मालाला या प्रक्रियेमुळे चांगला दर मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाºयांनी मोंढ्यातील लिलाव कक्षाला भेट देवून व्यापाºयांशीही चर्चा केली. या नव्यानेच सुरु झालेल्या लिलाव पद्धतीमुळे शेतकºयांना कमी वेळात शेतीच्या मालाचा लिलाव करता येणार आहे. तसेच भाव हि योग्य मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक लुट थांबण्यास कायमची मदत होणार आहे. या पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
ई-नाम प्रकल्पाचा कृउबात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:31 AM