आधी कारची विक्री, नंतर नोंदविली कारचोरीची फिर्याद, नगरसेवक पुत्राचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:27 PM2019-03-09T23:27:11+5:302019-03-09T23:27:38+5:30
कार एका जणाला विक्री केल्यानंतर ती चोरीला गेल्याची पोलिसांत फिर्याद नोंदवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई घेणाऱ्या नगरसेवकाचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चोरीची कार नंदुरबार येथून जप्त क रून आणली. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर तपास अधिकारी आता याबाबतचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करणार आहेत. शिवाय विमा मंजूर करणाऱ्या कंपनीसह संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल पाठविणार आहे.
औरंगाबाद : कार एका जणाला विक्री केल्यानंतर ती चोरीला गेल्याची पोलिसांत फिर्याद नोंदवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई घेणाऱ्या नगरसेवकाचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चोरीची कार नंदुरबार येथून जप्त क रून आणली. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर तपास अधिकारी आता याबाबतचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करणार आहेत. शिवाय विमा मंजूर करणाऱ्या कंपनीसह संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल पाठविणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दीपक मगन निकाळजे यांनी त्यांची कार (एमएच-२० ईवाय-०८०७) चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कारचोरीचा गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, फिर्यादी निकाळजे यांनीच त्यांची कार एका जणाला विक्री केली आणि कारच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी चोरीची तक्रार नोंदविल्याची माहिती खबºयाने पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांना दिली. त्यानंतर खाडे यांनी ७ मार्च रोजी एक आदेश काढून या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडे सोपविला. सोनवणे यांनी केलेल्या तपासात दीपक निकाळजे यांनी त्यांची कार पारिजातनगर येथील रहिवासी जगदीश संतोष जव्हेरी यांना साडेचार लाखांत विक्री केल्याचे समोर आले. कार खरेदीनंतर जव्हेरी यांनी वैयक्तिक कारणावरून राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी जव्हेरी यांनी ही कार हिरालाल सोनी (रा. नंदुरबार) यांना विक्री केल्याचे समजले. यानंतर सपोनि. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रमेश सांगळे, विष्णू मुढे यांनी नंदुरबार येथून ही कार जप्त करून आणली.
बँक अधिकाºयांसोबत मिलीभगत
सूत्रांनी सांगितले की, कार खरेदीसाठी निकाळजे यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. यापैकी साडेसात लाख रुपये कर्ज कारवर होते. असे असताना बँकेने त्यांना नो ड्यूज प्रमाणपत्र दिले. त्याआधारे त्यांनी ती कार विक्र ी केली. शिवाय पोलिसांकडून कारचोरीचा एफआयआर मिळवून त्याआधारे त्यांनी विमा कंपनीकडून विम्याची रक्कमही मिळविल्याचे सूत्रांनी सांगितले.