औरंगाबाद : परीक्षेत गुण मिळवायचे म्हणून शिकायचे हे विद्यार्थ्यांच्या मनात ठासलेले असल्याने ज्ञान मिळविण्यासाठी, ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी शिकायचे असते, हे जणू विद्यार्थी विसरले आहेत. मात्र नवे शैक्षणिक धोरण सध्याच्या शिक्षणातला साचेबद्धपणा दूर करून मुलांच्या सृजनशीलतेला, संशोधनात्मकवृत्तीला, मानसिक- शारीरिक क्षमतांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडविणारे असेल, असा विश्वास ज्ञानदीप फाउंडेशनचे संचालक गोविंद काबरा यांनी व्यक्त केला.
लोकमत आणि डीएफसी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ डिसेंबर रोजी वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये काबरा यांनी नव्या शैक्षणिक धाेरणानुसार शिक्षण क्षेत्रात येणारे बदल याविषयी विद्यार्थी व पालकांना सखोल मार्गदर्शन केले. शैक्षणिक धाेरणाविषयी सांगताना ते म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी सगळी कौशल्ये अभ्यासक्रमातच सामाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता घोकंमपट्टी टाळून विषय समजून घेण्याला आणि ज्ञानार्जन करण्यासाठी शिकण्याला आपसूक प्रोत्साहन मिळेल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्यात आले असल्याचेही काबरा यांनी सांगितले.
चौकट :
मानसिक आरोग्यासाठी लसीकरण
नकार ऐकण्याची, परीक्षेतील अपयश पचविण्याची मुलांना सवय राहिलेली नाही. यामुळे ते फार लवकर खचून जातात. हे टाळण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना मैदानी खेळाची सवय लावा, खेळांमधला जय-पराजय म्हणजे एकप्रकारे मानसिक आरोग्यासाठी असणारे लसीकरणच आहे, असा विशेष मुद्दाही काबरा यांनी मांडला.
चौकट :
ब्रीज काेर्स
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि मुलांची शिक्षणाची आवड कमी होऊ नये, यासाठी दि. १५ डिसेंबर ते २८ मार्च या कालावधीत ब्रीज काेर्सचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट स्पष्ट करण्यावर भर दिला जाईल, असेही काबरा यांनी नमूद केले.
चौकट :
१. डीएफसीचा ॲडव्हान्स फाउंडेशन काेर्स
शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या विशेष तयारीसाठी डीएफसीतर्फे ॲडव्हान्स फाउंडेशन कोर्स तयार करण्यात आला आहे. सध्या इयत्ता ७ वी व ८ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी पुढीलवर्षीपासून हा कोर्स करू शकतात. या कोर्समध्ये आयजेएसओ, आरएमओ या आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धांची तयारी करून घेतली जाईल. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. २० डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर मेसेज पाठवून नावनोंदणी करावी.
२. डीएफसीची वैशिष्ट्ये-
- विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी विशेष हेल्पलाईन सिस्टीम.
- प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सेल्फ स्टडी चार्ट.
- सुनियोजित पद्धतीचे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे रेकॉर्ड.
-पीअर ट्युटरींग म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा जो धडा पक्का असेल, त्याने तो इतर विद्यार्थ्यांनाही समजावून सांगायचा.