निवडणूक विभागाचा गोंधळ; उशिरापर्यंत माहितीच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:27 AM2017-09-29T00:27:54+5:302017-09-29T00:27:54+5:30
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती. कारभार आॅनलाईन झाल्यामुळे अडचणी येत असल्याचे कारण निवडणूक विभागाने सांगितले आहे. दरम्यान दुसºया दिवशीही माहिती न मिळाल्यामुळे या विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.
जिल्ह्यात ६९० ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत आहे. यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याची छाननी २५ सप्टेंबर रोजी होती. त्यादिवशीही उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे किती अर्ज बाद करण्यात आले, याची माहिती नव्हती. तसेच २७ सप्टेंबर रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाकडे ही माहिती उपलब्ध न झाल्याने येथील अधिकारी, कर्मचारी किती जोमाने काम करतात, हे समोर आले आहे. तर त्यांना तहसील मार्फत किती वेगाने माहिती पाठविली जाते, हेही दिसते.