वीजदर वाढीचा चटका! ३०० युनिटला दरमहा ८४७ तर वर्षभराच्या बिलात १०,१६४ रुपयांनी वाढ
By साहेबराव हिवराळे | Published: April 10, 2024 05:53 PM2024-04-10T17:53:32+5:302024-04-10T17:54:00+5:30
पुढच्या वर्षीही वाढ होणार; इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक..
छत्रपती संभाजीनगर : राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने बिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ लागू केली आहे, तर स्थिर आकारातही दहा टक्के दरवाढ केली आहे. ही वाढ एक एप्रिलपासून लागू झाली आहे.
समजा, तुमचा दर महिन्याचा वीज वापर शंभर युनिट आहे, तर सध्याच्या बिलात दरमहा ४९ रुपये, तर वर्षभराच्या बिलात ५८८ रुपयांनी वाढ होणार आहे. वापर ३०० युनिट असेल तर दरमहाच्या वीज बिलात ८४७ रुपयांनी तर वर्षभराच्या बिलात १० हजार १६४ रुपयांनी वाढ होणार आहे. तीनशे युनिट आणि त्यावरील विजेचा वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ होणार आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक..
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक आहेत. वीज गळती रोखण्याकडे यंत्रणा लक्ष देत नाही तर दरवर्षी तोटा भरून काढण्यासाठी दर वाढवून घरगुती, व्यावसायिक ग्राहकांच्या खिशावर भुर्दंड टाकते. शहरात व्यावसायिक व सामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार होय. इतर राज्यांना नियोजन जमते, आपल्याला का नाही?
- अजित देशपांडे
भरावेच लागणार...
महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने गेल्या वर्षीच ही दरवाढ जाहीर केली होती. आता फक्त अंमलबजावणी केलेली आहे. पुढच्या वर्षीही वाढ होणार आहे.
- प्रसाद कोकीळ, उद्योजक
एक एप्रिलपूर्वी दरमहा बिल (रुपयांमध्ये)
वापरलेले युनिट -१०० - ३०० - ५००
-स्थिर आकार - ११६ - ११६ - ११६
-वीज आकार - ४४१ - २३६९ -५०९१
-वीज शुल्क (१६ टक्के) -१११.६४- ४७२.१६ -९६४.३२
वीजवहन आकार (१.१७ रुपया प्रतियुनिट) ११७- ३५१- ५८५
इंधन समायोजन आकार -२५- ११५- २३५
एकूण वीजबिल -८१०.८४- ३४२३.१६- ६९९१.३२
गणित मांडताना प्रतियुनिट दर आणि वहन आकार एकत्र करून गृहित धरलेला दर-५.५८ - १०.८१- १४.७८
एक एप्रिलपासून दरमहा बिल (रुपयांत)
स्थिर आकार- १२८ - १२८- १२८
वीज आकार- ४७१- ३०८७- ७२७५
बीज शुल्क (१६ टक्के)- ११८.५६- ५८८.९६ - १३१५.६८
वीज वहन आकार (१.१७ रुपया प्रतियुनिट)- ११७- ३५१- ५८५
इंधन समायोजन आकार- २५- ११५- २३५
एकूण वीजबिल- ८५९.५६ (वाढ ४९ रुपये)- ४२६९.९६ (वाढ ८४७ रुपये)- ९५३८.६८ (वाढ २५४७.३६)
गणित मांडताना प्रतियुनिट दर आणि वहन आकार एकत्र करून गृहीत धरलेला दर- ५.८८ - ११.४६ -१५.७२
हे माहीत का तुम्हाला?
- सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.
-प्रत्यक्षात १०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांना दर महिन्याला बिलात ६.१७ टक्क्यांनी वाढ होणार
- ३०० युनिट विजेचा वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा २४.७४ टक्क्यांनी
-५०० युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा ३६.४४ टक्के वाढ होणार