अतिक्रमणे रात्री काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:58 AM2017-12-17T00:58:36+5:302017-12-17T00:58:39+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत.

 To encroach on night | अतिक्रमणे रात्री काढणार

अतिक्रमणे रात्री काढणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून अतिक्रमण केलेल्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात येईल. यानंतरही अतिक्रमण न काढल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांवरून दुचाकी, चारचाकी वाहने सहज ये-जा करू शकतील एवढा रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यात येणार आहे.
शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण हटाव पथकाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून दररोज विविध रस्त्यांवर पथक फिरविण्यात यावे.
नागरिकांना, वाहनधारकांना अजिबात त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर प्रशासकीय विभागाची यंत्रणा लगेच कामाला लागली. शनिवारी एका जीपवर युद्धपातळीवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आला. सायंकाळी सहा वाजता प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग, पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, गवळी आदी कर्मचाºयांचा ताफा महापौरांनी रवाना केला.
या पथकाने पोलिसी बंदोबस्तात शहागंज चमनपासून स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. महापालिकेचा ताफा पाहताच रस्त्यांवरील हातगाड्या, फेरीवाले सैरावैरा पळू लागले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे शहरातील त्रस्त नागरिकांनाही हायसे वाटले. पथकाने शहागंज चमनचा श्वास चारही बाजंूनी मोकळा केल्यावर मोर्चा गांधी पुतळा सिटीचौककडे वळविला.
सिटीचौक ते गुलमंडी आणि नंतर पैठणगेटपर्यंत अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरीवाल्यांना उद्यापासून रस्त्यावर याल तर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी रस्त्यांवरच खुर्च्या, हातगाड्या लावल्या होत्या. हे सर्व साहित्य महापालिकेच्या पथकाने जप्त केले. महापालिकेला हा उपक्रम राबविण्यासाठी एक रुपयाही खर्च आला नाही. फक्त उपलब्ध यंत्रणेला कामाला लावण्यात आले.
व्यापाºयांसह नागरिकही आनंदी
नोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापाºयांचे कंबरडे मोडले आहे. गुलमंडी, रंगारगल्ली, टिळकपथ, पैठणगेट येथे व्यापाºयांनी लाखो रुपये भाडे भरून दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांसमोर २४ तास हातगाड्या, फेरीवाल्यांचा मुक्त संचार असतो.
दुकानात येणाºया ग्राहकाला दुचाकी वाहनही उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे मनपाच्या कारवाईचे व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महापालिकेची सायंकाळी सुरू झालेली कारवाई पाहून दुचाकी वाहनधारकांनी मनपाच्या पथकाचे आभार मानले.

Web Title:  To encroach on night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.